इंदापूर तालुक्यातील शेतकरी तिहेरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:07+5:302021-08-25T04:15:07+5:30
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरगुडे मसोबाचीवाडी, शेटफळगडे, पिंपळे आदी भागातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंद केला आहे. तसेच ...
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरगुडे मसोबाचीवाडी, शेटफळगडे, पिंपळे आदी भागातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंद केला आहे. तसेच या भागातून शेतीच्या पाण्यासाठी जाणाऱ्या कालवा देखील गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिके पाण्यावाचून जळून लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पाऊस नसल्याने पेरणी केली नाही तर, काही शेतकऱ्यांची उभी पिके पावसामुळे जळून जाण्याच्या मार्गावर असता आहेत. काही शेतकऱ्यांना काही प्रमाणात पाणी असूनही पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने तेही पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच कोरोनाने डोके वर काढल्याने अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किमान उसाची पिके जाईपर्यंत तरी वीज तोडणी कार्यक्रम बंद करावा, तसेच उन्हाळ्यातही वीजबंद आणि आता पावसाळ्यातही बंद असा कार्यक्रम महावितरण राबवत असल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केलेल्या कालावधीचे वीज बिल आकारू नये, अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. पाण्यावाचून जळालेले पिकाचे पंचनामे तरी करून नुकसानभरपाई महावितरण व शासनाने द्यावी, अशी मागणी देखील या परिसरातील शेतकरी करीत आहेत.