शेतकऱ्यांनी बी. के. बी. एन. रस्त्याचे काम थांबवले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:49+5:302021-05-23T04:10:49+5:30

कुरवली : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातल्या नीरा नदी लगतच्या कुरवली व जांब गावातील शेतकऱ्यांनी बारामती कळंब बावडा नरसिंगपूर ...

Farmers K. B. N. Road work stopped. | शेतकऱ्यांनी बी. के. बी. एन. रस्त्याचे काम थांबवले.

शेतकऱ्यांनी बी. के. बी. एन. रस्त्याचे काम थांबवले.

googlenewsNext

कुरवली : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातल्या नीरा नदी लगतच्या कुरवली व जांब गावातील शेतकऱ्यांनी बारामती कळंब बावडा नरसिंगपूर (बी के बी एन) रस्त्याचे काम थांबवले. सध्या बारामती- कळंब- बावडा नरसिंगपूर या रस्त्याचे काम सुरू आहे. इंदापूर तालुक्याच्या जांबनजीक चव्हाणवस्तीपर्यंत रस्त्याचे खोदाईचे काम सुरू असताना कुरवली व जांब गावातील रस्त्यालगतच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यासाठी संपादित झालेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी एकत्रित येत रस्त्याचे काम थांबवले. जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

बी के बी एन रस्त्यासाठी कुरवली व जांब गावातील रस्त्यालगत शेतकऱ्यांची जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या रस्त्यासाठी जमिनी संपादित केले पासून आजतागायत मोबदला मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बीकेबीएन रस्त्याचे सध्या विस्तारीकरण काम सुरू असून याकामी रस्तालगतच्या शेतीमध्ये निशाणी खांब लावण्यात आले आहेत. जांब व कुरवली गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा वरती या रस्त्याची नोंदच झाली नसल्याचे दिसत आहे. मात्र रस्ता झालेला आहे असे शेतकरी मोबदला पासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांनी आज सकाळी सुरू असलेले रस्त्याचे काम थांबवले असून रस्त्यासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी अनिल पांढरे, अमर रुपनवर, दादासो पाटील, शिवाजी रुपनवर, सतीश पांढरे, तानाजी चव्हाण, ताराचंद थोरात, महेश पांढरे, महेंद्र पांढरे, प्रमोद माने, अविनाश कदम यांनी याबतचेा निवेदन बारामती प्रांताधिकारी यांना दिले.

--

यांनी बीकेबीएन रस्त्यासाठी ३५ वर्षांपूर्वी जमीन संपादित झाल्यापासून जांब हद्दीतील चव्हाण वस्ती ते कुरवली गावापर्यंत रस्त्याच्या लगत शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या विस्तारीकरणबाबत कोणतीही नोटीस अथवा पत्रव्यवहार शासनाकडून झाला नसल्याचे सांगितले. आम्ही शेतकरी एकत्रित येउन मोबदला मिळणेकामी शेतकरी कृती समिती स्थापन करून लढा देणार आहे.

- अनिल पांढरे, शेतकरी

--

फोटो क्रमांक : २२ कुरवली शेतकरी आंदोलन

फोटो ओळ - जांब (ता. इंदापूर) येथे रस्त्याचे काम थांबवताना शेतकरी

Web Title: Farmers K. B. N. Road work stopped.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.