वीज दरवाढी विरोधात येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:58 IST2018-03-24T20:58:49+5:302018-03-24T20:58:49+5:30

मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी उपसा योजनांचा वीज दर १.१६ रुपये करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

Farmers maarch on vidhanbhavan against increasing electric power rate | वीज दरवाढी विरोधात येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा

वीज दरवाढी विरोधात येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा

ठळक मुद्देज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी मोर्चाचे नेतृत्व करणार

पुणे : राज्यातील ४१ लाख शेतीपंप वीजग्राहकांच्या बिलातील पोकळ व बोगस थकबाकी रद्द करावी, सुधारीत कृषी संजीवनी योजना सुरु करावी, उपसा सिंचन योजनेचा वीज दर प्रती युनिट १.१६ रुपये करावा अशा विविध मागण्यांसाठी येत्या २७ मार्चला विधानभवनावर शेतकरी धडक मोर्चा नेणार आहेत. आझाद मैदान येथून सकाळी दहा वाजता मोर्चास सुरुवात होईल.
ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी मोर्चाचे नेतृत्व करतील. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी उपसा योजनांचा वीज दर १.१६ रुपये करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी वीज बिलांची तपासणी करुन बोगस व पोकळ थकबाकी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची देखील पूर्तता झालेली नाही. राज्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी वीजजोडणी मिळालेली नाही, अशा विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.   

Web Title: Farmers maarch on vidhanbhavan against increasing electric power rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.