हरभरा काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू
By admin | Published: March 4, 2016 12:30 AM2016-03-04T00:30:50+5:302016-03-04T00:30:50+5:30
आंबेगाव तालुक्यात सुमारे एक हजार ७०० एकर जमिनीत हरभरा पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने हरभरा पीक चांगले आले होते.
पेठ : आंबेगाव तालुक्यात सुमारे एक हजार ७०० एकर जमिनीत हरभरा पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने हरभरा पीक चांगले आले होते. शेतकऱ्यांनी नुकतीच हरभरा पीक काढणीची कामे शेतात चालू आहेत. हरभऱ्याची कडपे शेतात रचून ठेवलेली दिसत आहेत.
हरभरा पीक शेतकऱ्यांना फायदेशीर असून, जमिनीची सुपीकता वाढते. पुढील पीक घेण्याकरिता उत्तम बेवड तयार होते. हरभरा पीक चार महिन्यांच्या कालावधीत तयार होणारे, अधिक उत्पादनशील, मर रोग प्रतिकारक्षम आहे. काबुली हरभऱ्यापेक्षा देशी हरभऱ्याला चांगली मागणी आहे. हरभरा रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. हरभरे दाण्याच्या स्वरूपात असताना एक वेष्टणांत असतो, त्याला घाटा असे म्हणतात. हरभऱ्याचे मूळ स्थान तुर्कस्तान आहे, असे मानतात. अंकुर आलेले हरभरा बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे मॉलिक व आॅक्झालिक अॅसिड पोटांच्या आजारांसाठी उपाय म्हणून वापरता येते. जिराईत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असतो व एखादे पाणी देणे शक्य असेल, तर पिकाला फूल येऊ लागताच पाणी द्यावे लागते. गेले तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण तयार होत असून, पाऊस पडत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे कडपे झाकून सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग सुरू आहे.