पुरंदर तालुक्यात बुलेट ट्रेनला शेतक-यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:18+5:302021-08-01T04:10:18+5:30

भुलेश्वर :मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल काॅरीडाॅर साठी जमीन देण्यास पुरंदर तालुक्यात तीव्र विरोध असुन वाघापुर येथील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध करण्यासाठी ...

Farmers oppose bullet train in Purandar taluka | पुरंदर तालुक्यात बुलेट ट्रेनला शेतक-यांचा विरोध

पुरंदर तालुक्यात बुलेट ट्रेनला शेतक-यांचा विरोध

googlenewsNext

भुलेश्वर :मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल काॅरीडाॅर साठी जमीन देण्यास पुरंदर तालुक्यात तीव्र विरोध असुन वाघापुर येथील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध करण्यासाठी बैठक घेऊन एकमुखाने जमीन देण्यास तीव्र विरोध केला आहे.काहीही झाले तरी आम्ही जमिनी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच बुलेट ट्रेन येत आहे .त्याचा नकाशा ,बाधीत क्षेत्र,या मार्गावरील खुणा स्पष्ट झाल्या आहेत.तालुक्यातील वाघापुर,आंबळे,टेकवडी ,माळशिरस,राजुरी या गावामधुन जात आहे..बाधीत गट नंबर व शेतकरी जाहीर करण्यात आले आहे .बाधीत गावात

शेतक-यांशी बोलणी करण्यासाठी तसेच डी पी आर तयार करण्यासाठी दिल्ली येथील रेल्वे विभागाच्या वतीने अधीकारी येत आहेत वेगवेगळी माहीती विचारत आहेत.माञ आलेल्या अधिका-यांना शेतकरी माहीती देण्याबाबत तयार नाहीत. बुलेट ट्रेनला विरोध करण्यासाठी वाघापुर ग्रामस्थांनी बैठक घेऊन या प्रकल्पाला जमीन न देण्याचा निर्णय घेण्यात आला.काहीही झाले तर जमीनी देणार नसल्याचे जाहीर केले.यावेळी उपसरपंच सौरभ कुंजीर सोसायटी माजी अध्यक्ष बाजीराव कुंजीर , माजी केंद्रप्रमुख अशोक कुंजीर ,नितीन कुंजीर, उदय कुंजीर ,पोलीस पाटील विजय कुंजीर, शिवसेनेचे मनोज कुंजीर यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.

बुलेट ट्रेन बाधीत शेतकरी अशोक कुंजीर म्हणाले कि सर्वसामान्य शेतक-याला याचा काहीही फायदा नाही.शेतक-यांनी कर्जे काढुन पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे लाईन केल्या आहेत.आणि त्यावर जीवन जगत आहेत. एक तर येथील शेतक-यांना जमीनी कमी आहेत.आणि जर ही देखील जमीन गेली तर शेतकरी आत्महत्या करेल.वाघापुर परिसरातील सर्वच शेतक-यांचा याला विरोध आहे.

वाघापुर येथे बुलेट ट्रेनला विरोध करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

Web Title: Farmers oppose bullet train in Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.