पुण्यात विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक; सरकार हलवणारे आंद़ोलन करू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 03:01 PM2021-08-17T15:01:16+5:302021-08-17T15:01:22+5:30

कृषी आयुक्त कार्यालयात निदर्शने

Farmers' organizations aggressive against insurance companies in Pune; Let's move the government | पुण्यात विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक; सरकार हलवणारे आंद़ोलन करू

पुण्यात विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक; सरकार हलवणारे आंद़ोलन करू

Next
ठळक मुद्देकंपन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी

पुणे : विमा कंपन्यांकडून राज्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. या कंपन्यांच्या ५ वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी कृषी आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त कार्यालयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. कंपन्या व कृषी  अधिकारी याचे साटेलोटे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तूपकर म्हणाले, विमा कंपन्या लूट करत आहेत. त्यांनी ३५ हजार कोटींचा व्यवसाय केला. २५ हजार कोटी फायदा झाला.

काहीही कारणे सांगून विमा प्रस्ताव नाकारले जातात. या कंपन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. येत्या १५ दिवसात आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा राज्यातील शेतकरी इथे घेऊन येऊ. त्यावेळचे आंदोलन सरकार हलवणारे असेल असा इशारा तुपकर यांनी दिला.

Web Title: Farmers' organizations aggressive against insurance companies in Pune; Let's move the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.