शेतकऱ्यांनी भरले महावितरणचे २६ लाखांचे बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:28+5:302021-02-12T04:11:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : पारगाव (ता.दौंड) येथे राज्य शासनाच्या कृषी योजना २०२० अंतर्गत वीज बिलात दिलेल्या ५० ...

Farmers pay MSEDCL bill of Rs 26 lakh | शेतकऱ्यांनी भरले महावितरणचे २६ लाखांचे बील

शेतकऱ्यांनी भरले महावितरणचे २६ लाखांचे बील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

केडगाव : पारगाव (ता.दौंड) येथे राज्य शासनाच्या कृषी योजना २०२० अंतर्गत वीज बिलात दिलेल्या ५० टक्के सवलत आवाहनाला पारगावच्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत ५५ शेतकऱ्यांनी तब्बल २६ लाख ६८ हजारांचे वीजबिल भरले. यामुळे महावितरणतर्फे या ५५ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांना ५० टक्के सवलत देण्याचे सांगत या योजनेचा फायदा घेत वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ५५ शेतकऱ्यांनी तब्बल २६ लाख ६८ हजार वीजबिल एकरकमी भरले. यानिमित्त केडगाव येथील कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांनी या शेतकऱ्यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकारी अभियंता एडके म्हणाले की, शेतकरी लाईट बिल भरत नसल्यामुळे सध्या महावितरण तोट्यात गेले आहे. प्रशासनाने वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम राबवली आहे. या पार्श्वभूमीवर पारगाव परिसरातील शेतकऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. अवघ्या एका दिवसांमध्ये शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पारगाव येथील शेतकऱ्यांनी २६ लाख रुपये गोळा केले. त्याचा आदर्श इतर गावातील शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. दोन पंचायत समितीच्या उपसभापतिपदी सयाजी ताकवणे यांची निवड झाल्याबद्दल भीमा सोसायटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपकार्यकारी अभियंता संजय मालपे, शाखा अभियंता एन. पिसाळ, उपसभापती सयाजी ताकवणे, लक्ष्मण ताकवणे, सुभाष बोत्रे, नाना जेधे, सोमनाथ ताकवणे, सूर्यकांत शेळके, राजाराम बोत्रे, रमेश बोत्रे, नितीन बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी-पारगाव, दौंड येथे वीज बिल भरणा-या शेतकऱ्याचा सत्कार करताना कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, सयाजी ताकवणे व मान्यवर.

Web Title: Farmers pay MSEDCL bill of Rs 26 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.