शेतक-यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारच: पाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:53+5:302021-03-21T04:09:53+5:30
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुजित खैरे, ग्रामपंचायत सदस्य आरीफ आतार, संतोष ...
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुजित खैरे, ग्रामपंचायत सदस्य आरीफ आतार, संतोष दांगट, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, गणेश पाटे, विकास तोडकरी, अजित वाजगे, जालिंदर खैरे, किशोर पाटे आदींसह शेतकरी वसंत तांबे, राजाराम तांबे, सचिन तांबे, संपत तांबे, अनंत तांबे, कांताराम तांबे, निवृत्ती तांबे, नारायण तांबे, दिपक तांबे, ज्योती तांबे, वनिता तांबे, माधुरी तांबे, अंजली तांबे, माया तांबे, रूक्मिणी तांबे व इतर शेतकरी उपस्थित होते.
सरपंच पाटे म्हणाले की, नारायणगाव येथील सर्वे नं. २४/१९४ व २५/१९३ मध्ये सन २००८ साली तहसिलदार जुन्नर यांच्या आदेशान्वये पोलीस बंदोबस्तात व प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावर अमोल तांबे, गिताराम तांबे, शुभांगी तांबे, ओंकार तांबे यांनी शासनाने मंजूर केलेला रस्ता नांगरून त्यामध्ये ऊसाची लागवड केली होती. सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी सर्व शेतक-यांसमवेत गेलो असता त्यावेळी गिताराम तांबे व त्यांचे कुटूंबियांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. त्यावेळी आपण दोन्ही बाजुचे शेतक-यांना समजावून सांमज्यसाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजकीय दबावापोटी जाणीवपुर्वक आपल्यासह चार जणांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतक-यांच्या हितासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहू अशी माहिती सरपंच पाटे यांनी दिली.
यासंदर्भात शेतक-यां संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे म्हणाले की, कायदा, सुव्यवस्था बिघडेल अशी भुमिका कुणीही घेऊ नये. सर्व शेतक-यांच्या भावना व कागदपत्रांची पाहणी करून रस्त्यासंदर्भात योग्य ती भुमिका घेतली जाईल. महिलेने तक्रार केल्यामुळे सरपंच यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गेली दोन दिवसांपासून या घटनेची चर्चा सोशल मिडीयावर सुरू झाली. या प्रकारानंतर अनेक शेतक-यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याकडे सरपंच योगेश पाटे यांचेवर खोटा व राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्याचा आरोप केला.
फोटो -
नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या शेतक-यांना रस्त्यासंदर्भात मार्गदर्शन करताना नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे