शेतकऱ्यांचा रिंगरोडला विरोध, लेखी आश्वासन देण्याची शेतक-यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:39 AM2018-04-04T02:39:36+5:302018-04-04T02:39:36+5:30
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून साकारण्यात येणाºया रिंगरोडला हवेली तालुक्यातून विरोध होऊ लागला आहे. रिंगरोड होत असल्याने यामध्ये अनेक शेतकºयांच्या जमिनी जात आहे.
मांजरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून साकारण्यात येणाºया रिंगरोडला हवेली तालुक्यातून विरोध होऊ लागला आहे. रिंगरोड होत असल्याने यामध्ये अनेक शेतकºयांच्या जमिनी जात आहे. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यामुळे बाधित शेतकºयांनी पीएमआरडीएच्या विरोधात मोट बांधली आहे.
शेतकºयांना भूमिहीन करणार असेल, तर आम्ही शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करू, असे बाधित शेतकºयांनी सांगितले. मांजरी खुर्द येथे बाधित शेतकºयांची बैठक पार पडली. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश घुले आणि विकास लवांडे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
या वेळी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली.
या वेळी बाधित शेतकरी दिगंबर उंद्रे, प्रकाश सावंत, किशोर उंद्रे, सीताराम उंद्रे, उत्तम उंद्रे, शिवाजी उंद्रे, सचिन उंद्रे, डॉ. शिवदीप उंद्रे, अशोक आव्हाळे, संजय उंद्रे, शंकर कदम, सोमनाथ उंद्रे, शिवाजी शेळके, सोपान आव्हाळे, हनुमंत उंद्रे, गोरख बंडलकर, सदाशिव मुरकुटे, अमोल उंद्रे, नवनाथ सावंत, अरूण कदम, नाना मुरकुटे, अविनाश सावंत तसेच मांजरी, कोलवडी, आव्हाळवाडी परिसरातून शेतकरी उपस्थित होते.
भूमिपूजन असेल त्याच दिवशी सरकारच्याविरोधात भूमिपूजनाच्या ठिकाणी काळेझेंडे दाखवून सरकारविरोधात निदर्शने करण्यात येतील, असे संघर्ष समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले. शेतकºयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना बाधित शेतकºयांना मोबदला कसा देणार, याबाबत शासनाने लेखी पत्राद्वारे अद्यापही शेतकºयांना कळवण्यात आले नाही. आजपर्यंत ज्या बैठका झाल्या त्या निष्फळ ठरल्या आहेत. लवकरच हवेली तालुका रिंगरोडबाधित शेतकरी संघर्ष समिती पीएमआरडीएच्या आयुक्तांना भेट देऊन निवेदन देणार आहे. तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनाही
निवेदन देणार आहे असे बैठकीत ठरवण्यात आले.
योग्य मोबदला द्या
बाधित शेतकºयांना शासनाने समृद्धी महामार्गाप्रमाणे व पुरंदर येथील होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा विविध स्वरूपाच्या पाच ते सात निळनिराळ्या मोबदल्याचा प्रस्ताव शासनाने शेतकºयांना लेखी द्यावा. त्यातील शेतकºयांना जो योग्य मोबदला वाटेल तो बाधित शेतकरी निवडेल.
- सुरेश घुले, माजी अध्यक्ष,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस