भाव मिळत नसल्याने दुधाचे माेफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:17 PM2018-05-03T15:17:28+5:302018-05-03T15:21:22+5:30

दुधाला 27 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून राज्यात अांदाेलन करण्यात येत अाहे. पुण्यात नागरिकांना शेतकऱ्यांकडून माेफत दूध वाटण्यात अाले.

farmers protest to get minimum support price for milk | भाव मिळत नसल्याने दुधाचे माेफत वाटप

भाव मिळत नसल्याने दुधाचे माेफत वाटप

Next
ठळक मुद्देदुधाला 27 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा अशी मागणीनागरिकांना दूध वाटून केले अांदाेलन

पुणे : दूधाला 27 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यात विविध ठिकाणी अांदाेलन करण्यात अाले. पुण्यात जिल्हाधिकार्यालयासमाेर नागरिकांना माेफत दूध वाटण्यात अाले. तसेच सरकारचा निषेध करण्यात अाला. या अांदाेलनावेळी माेठ्याप्रमाणावर शेतकरी उपस्थित हाेते. 
    इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संप पुकारला हाेता. त्यावेळी सरकारने दूधाला किमान 27 रुपये प्रतिलिटर भाव देण्याची हमी दिली हाेती. परंतु सरकारने अाश्वासन देऊनही ते पूर्ण केले नाही. उलट दुधाचा भाव काेसळून ते 19 रुपये प्रतिलिटरांपर्यंत गेले अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून राज्यात विविध ठिकाणी अांदाेलन करण्यात येत अाहे. लुटणे थांबवा, शरम नसेल तर फुटकच न्या असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला अाहे. या अनुषंगाने 3 ते 9 मे या काळात राज्यभर चाैका-चाैकात माेफत दूध वाटप सप्ताह अायाेजित करण्यात अाला अाहे. 
    अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात सरकारने जाहीर केलेला दर शेतकऱ्यांना मिळाव यासाठी भावांतर याेजना लागू करुन जाहीर दर व प्रत्यक्ष दर यातील अंतर भरुन काढण्यासाठी लिटरमागे दहा रुपये अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा. दुधाच्या पावडरला निर्यात अनुदान द्या, शालेय पाेषण अाहारात दुधाचा समावेश करा. या उपयांमधून दूध संकटांवर मात करण्यासाठी तातडीने पाऊले उचला अादी मागण्या करण्यात अाल्या अाहेत. 
-

Web Title: farmers protest to get minimum support price for milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.