जारकवाडीतील शेतीशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:52+5:302021-06-24T04:09:52+5:30
शेतीशाळेचे आयोजन आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे व उपसंचालक पुनम खटावकर, अर्चना क्षिरसागर व तालुका कृषी अधिकारी टी.के. ...
शेतीशाळेचे आयोजन आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे व उपसंचालक पुनम खटावकर, अर्चना क्षिरसागर व तालुका कृषी अधिकारी टी.के. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याला शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला.
महिला व शेतकऱ्यांना आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडिभाऊ पाबळे यांनी स्मार्ट प्रकल्प व टोमेटो शेतीशाळेमध्ये होणाऱ्या विविध विषयाविषयी मार्गदर्शन केले. तसेच उद्यानविद्या विषयतज्ञ भरत टेमकर यांनी टोमेटो रोपवाटिका व लागवड व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी अविनाश ढोबळे यांनी टोमेटो पीकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडिभाऊ पाबळे यांनी प्रस्ताविक केले. मनिषा जारकड यांनी महिला शेतकऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब ढोबळे व जिज्ञासाचे संदेश पवार, योगिता लोखंडे, मालन पाचपुते, अरुणा टाव्हरे, ऋतुजा ढोबळे व बचत गटातील महिला व शेतकरी उपस्थित होते