उजनीच्या पाण्यासाठी सरडेवाडीतील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:34+5:302021-05-28T04:08:34+5:30

वाटेल ती किंमत मोजू; परंतु पंधरा दिवसांत इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी ...

Farmers in Sardewadi blocked Pune-Solapur highway for Ujjain water | उजनीच्या पाण्यासाठी सरडेवाडीतील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

उजनीच्या पाण्यासाठी सरडेवाडीतील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

Next

वाटेल ती किंमत मोजू; परंतु पंधरा दिवसांत इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी संघर्ष कृती समितीने घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातून इंदापूरच्या पाच टीएमसी पाण्याला विरोध झाला. त्यामुळे शासनाला पाणी वाटपाचा आदेश रद्द करावा लागला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. कारण इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटणार आहे. उजनी धरण होताना इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या हजारो एकर शेतजमिनींचा त्याग केलेला आहे. पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरकू न देण्याची भाषा सोलापुरातील काही नेतेमंडळी करत आहेत. तसे घडल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याची गाडी भीमानगर पुलाच्या अलीकडे येऊ न देता, जशास तसे उत्तर दिले जाईल, असे इंदापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समितीकडून सूचित करण्यात आल्याने पाणीप्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

————————————————————

उजनीतील पाच टीएमसी पाणी निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी सरडेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करताना शेतकरी.

२७०५२०२१-बारामती-१५

————————————————

Web Title: Farmers in Sardewadi blocked Pune-Solapur highway for Ujjain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.