शेतकऱ्यांचे सातबारा, ८ अ संगणकीकृत करताना मोठ्या चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 11:53 PM2019-02-06T23:53:27+5:302019-02-06T23:53:51+5:30

आंबेगाव तालुक्यातील शेतक-यांचे ७-१२ व ८ अ उतारे संगणकीकृत करताना मोठ्या चुका झालेल्या असून, सात-बारा उता-यावरील नावे कमी झाली आहेत.

Farmers' Seven Passage, 8A Big Fixes During Computerization | शेतकऱ्यांचे सातबारा, ८ अ संगणकीकृत करताना मोठ्या चुका

शेतकऱ्यांचे सातबारा, ८ अ संगणकीकृत करताना मोठ्या चुका

Next

अवसरी  - आंबेगाव तालुक्यातील शेतक-यांचे ७-१२ व ८ अ उतारे संगणकीकृत करताना मोठ्या चुका झालेल्या असून, सात-बारा उता-यावरील नावे कमी झाली आहेत. तसेच, समाईक क्षेत्रावरील नावे कमी झाले आहेत. तर, अवसरी बुद्रुक येथील प्रताप रत्नाकर हिंंगे यांच्या नावावरील २० गुंठे जमीन गायब झाली आहे. २० गुंठे जमीन पुन्हा नावावर करण्यासाठी घोडेगाव येथे हेलपाटे मारूनदेखील कोणीही दाद देत नसल्याने लवकरच जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रताप हिंगे यांनी सांगितला.

अवसरी बुद्रुक येथील प्रताप रत्नाकर हिंगे यांच्या नावावर चवरेमळा, हिंगेवस्ती येथील अर्धा एकर/२० गुंठे जमीन आहे. मागील वर्षी त्याच्या नावावरील २० गुंठे जमीन गायब होऊन त्यांच्या ७-१२ वरील क्षेत्राला आळे करण्यात आले. त्यानंतर हिंगे यांनी तलाठी कार्यालयात गेल्या वर्षापासून हेलपाटे मारल्यानंतर त्यांना सांगण्यात आले, की तुमचा ७-१२ दुरुस्त करण्यासाठी १५५ अंतर्गत तहसील कार्यालयात अर्ज करा. त्यासाठी जुना हस्तलिखित ७-१२ उतारा नवीन संगणीकृत उतारा व अर्ज अशी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिन्यानंतर तुमचे काम होईल, असे तलाठी कार्यालयात सांगण्यात आले. त्यामुळे प्रताप हिंगे यांना एक वर्ष तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून काहीच उपयोग झाला नाही.
याबाबत तहसीलदार सुषमा पैकीकरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की तुमच्या नावावरील क्षेत्र कमीजास्त झाले त्यासाठी सात-बारा उताºयाची चौकशी करावे लागेल.

आंबेगाव तालुक्यातील सर्वच गावांतील महसूल विभागामार्फत ७-१२ व ८अ उतारे संगणीकृत करण्याचे काम सहा वर्षांपासून चालू आहे. आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ तलाठी, मंडलाधिकारी यांना कॉम्प्युटरचा अनुभव नसल्याने अनेक तलाठ्यांना खासगी कॉम्प्युटर चालकांकडून तालुक्यातील शेतकºयांचे ७/१२, ८अ संगणीकृत करून घ्यावे लागत आहे. हे करत असताना अनेक शेतकºयांची नावे ७/१२ उताºयावरून कमी झाली आहेत. समाईक क्षेत्र गायब झाले आहे.

Web Title: Farmers' Seven Passage, 8A Big Fixes During Computerization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.