शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:37+5:302021-02-06T04:18:37+5:30
मार्गासनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. पुणे ...
मार्गासनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. पुणे येथील विधान भवन येथे कृषिमंत्री दादासाहेब भुसे आले होते. त्यावेळी बचत गटातील सदस्यांनी त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान गटातील सदस्यांचे त्यांनी कौतुक केले तर इंद्रायणी तांदुळाची गुणवत्ता राखून ठेवण्याचे गटातील शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी कृषी संचालक दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, रफीक नाईकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर,कृषी सहायक तुषार तडवी, आत्माचे नीलेश अबदाहगिरे, शेतकरी लक्ष्मण भोसले,किरण भोसले अशोक लिम्हण, महेश सणस आदी उपस्थित होते. यावेळी वेल्हे तालुक्यातील विंझर संजीवनी सेंद्रिय बचत गटातून तयार झालेल्या इंद्रायणीच्या जातीच्या तांदळांचे राजतोरण व राजगड तांदळाच्या ब्रॅंडचे कौतुक कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.
दादासाहेब भुसे म्हणाले की, सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने पिकांची गुणवत्ता चांगली राहते
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. तसेच विंझर येथील संजीवनी गटातील सर्व सदस्यांचा सत्कार यावेळी दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.
वेल्हे तालुक्यातील सेंद्रिय शेतीमधून निघालेला इंद्रायणी जातीच्या तांदळास चांगली बाजारपेठेत
मागणी वाढली आहे. विंझर येथील संजीवनी बचतगटाने सेंद्रिय पद्धतीने शेती करून इंद्रायणी
जातीच्या तांदळांचे उत्पादन केले असून राजतोरण नावाने ग्राहकांपर्यत पोहचवत आहे. ग्राहकांच्या पसंतीस हा तांदूळ चांगला उतरला असून गटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर वितरण सुरू झाले आहे. आतापर्यंत इंद्रायणी जातीचा तांदळाची २० टन तांदळाची विक्री झाली असल्याची माहिती संजीवनी गटाचे अध्यक्ष दिनकर भोसले यांनी दिली.
सेंद्रिय पद्धतीने केलेला राजतोरण इंद्रायणी तांदळाचे उत्पादन चांगले चालले असून भविष्यात गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाणार आहे
- दिनकर भोसले, सदस्य, संजीवनी गट विंझर
०५ मार्गासनी
कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते विंझर येथील संजीवनी गटाचे लक्ष्मण भोसले व इतर शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.