सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:36+5:302021-07-02T04:08:36+5:30

मार्गासनी: वेल्हे तालुका हा तांदळाचे आगार असून, येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच शेती करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनंजय ...

Farmers should cultivate organically | सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी

सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी

Next

मार्गासनी: वेल्हे तालुका हा तांदळाचे आगार असून, येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय

पद्धतीनेच शेती करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर

यांनी केले आहे.

वेल्हे पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती वेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन आणि कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, माजी सभापती सीमा राऊत, कॉंग्रेसचे तालुका

अध्यक्ष नाना राऊत, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती कृषी अधिकारी

उत्तम साखरे, कृषी विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के, कृषी अधिकारी तानाजी गायकवाड,

कृषी सहायक तुषार तडवी, शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे आदीसह अधिकारी शेतकरी उपस्थित होते.

धनंजय कोंढाळकर म्हणाले की, तालुक्यात

भातशेतीचे प्रमाण जास्त आहे. राजतोरण इंद्रायणी जातीच्या तांदळाचा ब्रॅंड नावाने ओळखला

जात असून आतापर्यंत २० टन तांदूळ बाजारपेठेत विकला गेला आहे. सेंद्रिय पद्धतीने तांदळाचे

उत्पादन घेतल्याने या तांदळास बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच कृषी विभागामार्फत

कृषी संजीवनी मोहिमेत तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना शासकीय योजनेबद्दल

माहिती देण्यात आली आहे.

काही शेतकऱ्यांचे आनलाइन फॅार्म भरण्यात आले आहेत. तसेच सेंद्रिय

पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन मिळविलेले शेतकरी गोविंद पोळेकर, लक्ष्मण खेडेकर, दगडू कोडीतकर, प्रमोद गुजर, बबन ठाकर, बंडा दामगुडे आदी शेतकऱ्यांना सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद

सदस्य दिनकर धरपाळे यांच्या हस्ते गौरविले.

०१ मार्गासनी

शेतकरी

बंडा दामगुडे यांचा सत्कार करताना दिनकर सरपाले व इतर.

Web Title: Farmers should cultivate organically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.