शेतकऱ्यांनी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:43+5:302021-02-07T04:10:43+5:30
मार्गासनी: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व मृद ...
मार्गासनी: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व मृद व जलसंधारण विभागाचे
अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले.
वेल्हे येथे मनरेगा व ग्रामसमृद्धी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, अभिनव
फार्मर क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके, शिरुर येथील जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी मुख्याध्यापक दत्ता वारे, नायब तहसीलदार संजय कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे,दिनकर धरपाळे,पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले,गटविकास अधिकारी विशाल शिंदे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष
रेणुसे,माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर उपस्थित होते.
नंदकुमार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे, शेतक-यांनी आपल्या मुलांना
चांगले शिक्षण द्यावे तसेच तालुक्यातील शेतक-यांना जरी शेती कमी असली किंवा शेतीला पाणी देखील कमी असले तरी बाजारपेठेचा अभ्यास, पिकांची मागणी याचा सारासार विचार करुन आधुनिक पद्धतीने शेती करावी. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी रस्ते,पाण्याची व्यवस्था आदी कामे करावी
असे आवाहन यावेळी नंदकुमार यांनी केले.
आयुष प्रसाद म्हणाले की, रोजगार हमी योजनेतून २७५ प्रकारची कामे करता येतात. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या इमारतीचे
बांधकाम देखील रोजगार हमी योजनेच्या कामातून केली जाणार आहेत.
अभिनव फार्मर क्लबचे
ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांनी शेती कमी खर्चात, आधुनिक पद्धतीने व सोयीस्करपणे कशी करावी आणि शेतक-यांच्या
उत्पन्न झालेल्या शेतीमाल व भाजीपाला यास बाजारपेठे कशी मिळविता येते यांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
०६ मार्गासनी