शेतकऱ्यांनी महा- डीबीटी पोर्टलवर नावनोंदणी करावी : कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:23+5:302020-12-23T04:08:23+5:30

कृषी विभागाच्या वतीने महा डीबीटी पोर्टल विषयी माहिती देण्यासाठी वासुंदे येथे आयोित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कदम म्हणाल्या की, ...

Farmers should register on Maha-DBT portal: Kadam | शेतकऱ्यांनी महा- डीबीटी पोर्टलवर नावनोंदणी करावी : कदम

शेतकऱ्यांनी महा- डीबीटी पोर्टलवर नावनोंदणी करावी : कदम

googlenewsNext

कृषी विभागाच्या वतीने महा डीबीटी पोर्टल विषयी माहिती देण्यासाठी वासुंदे येथे आयोित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कदम म्हणाल्या की, कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा- डीबीटी पोर्टलवरील संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावा लागेल. सदर नोंदणी क्रमांक महा- डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा- डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून द्यावा लागेल.

त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही . पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी , पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थाच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ . सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे .महा- डीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात.

Web Title: Farmers should register on Maha-DBT portal: Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.