शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घ्यावे

By admin | Published: January 25, 2017 11:48 PM2017-01-25T23:48:17+5:302017-01-25T23:48:17+5:30

निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घेऊन उत्पादन घेतले पाहिजे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ

Farmers should understand the technology | शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घ्यावे

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घ्यावे

Next

नारायणगाव : निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घेऊन उत्पादन घेतले पाहिजे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ डॉ. ़विनय सुपे यांनी नारायणगाव येथे केले़
उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डाळींब पिकावरील कीड-रोग सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत तालुका जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व शेतकरीसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ़ सुपे हे बोलत होते़
या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर बाळासाहेब मगर, तंत्र अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे रोहिदास मासळकर, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव डॉ़ राजपूत, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव संजय विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी शिरूर संजय पिंगट, तालुका कृषी अधिकारी खेड लक्ष्मण व्होटकर, तालुका कृषी अधिकारी जुन्नर हिरामण शेवाळे आदी उपस्थित होते़
प्रास्ताविकात उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर बाळासाहेब मगर यांनी डाळींब पिकावरील कीड-रोग सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) प्रकल्पाविषयी माहिती देताना या योजनेचा लाभ व सल्ला कशा प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो याची माहिती दिली़ कार्यक्रमात प्रमुख वक्ते कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ डॉ. ़विनय सुपे यांनी डाळींब पिकासाठी योग्य जमीन, लागवड पद्धती, विविध जाती, कलमे निवडताना घ्यावयाची काळजी, सिंचन पद्धत, आंतरमशागत, झाडाला वळण देणे, खत व्यवस्थापन, बहार
नियोजन, डाळींब पिकावर येणाऱ्या किड-रोगांची माहिती व व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांबाबत माहिती दिली़
सुभाष काटकर यांनी फळपीक विमाबाबत मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.(वार्ताहर)

Web Title: Farmers should understand the technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.