पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:16+5:302021-05-09T04:10:16+5:30

तालुक्यातील मोरगाव पशू दवाखान्याअंतर्गत मोरगाव, तरडोली, राजबाग, शेरेवाडी, आंबी खुर्द, आंबी बुद्रूक ही गावे येतात. तालुक्याच्या ग्रामीण भागातील या ...

Farmers should vaccinate their animals before the monsoon | पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे

पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे

Next

तालुक्यातील मोरगाव पशू दवाखान्याअंतर्गत मोरगाव, तरडोली, राजबाग, शेरेवाडी, आंबी खुर्द, आंबी बुद्रूक ही गावे येतात. तालुक्याच्या ग्रामीण भागातील या गावांतील लोकांचा शेती व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालनचा व्यवसाय आहे .पावसाळ्यात जानावरे, शेळ्या मेंढ्या, कोंबड्या यांना विषाणूजन्य आजारामुळे मृत पावण्याची शक्यता असते. पावसाच्या तोंडावरच जनावरांना लाळखुरकत, घटसर्प, फऱ्या हे रोग शेळ्या-मेंढ्यांना आंतर विषार, पीपीआर, बुळकांडी तर कोंबड्यांना मानमोडी, देवी, लासोटा हे रोग होतात. मोरगाव परिसरात १९ व्या पशुगणनेनुसार गायवर्ग जनावरांची संख्या ४६६९, म्हैसवर्गीय १८४ तर शेळ्या २२५६, मेंढ्या ४२६४ तसेच कोंबड्यांची संख्या पंधरा हजारपेक्षा अधिक आहेत.

पावसाळ्यात जनावरे अथवा पशुधन मृत्यू पावल्यास होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून वाचण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन गावडे यांनी केले आहे. मोरगाव दवाखान्यामध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर दवंडीमार्फत हा संदेश गावोगावी दिला जाणार आहे.

Web Title: Farmers should vaccinate their animals before the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.