शेतकऱ्याचा मुलगा बनला केंद्रीय सशस्त्र बलातील कमांडंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:19+5:302021-02-10T04:10:19+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षांमध्ये राजेगाव (ता. दौंड) येथील भूषण भरत जाधव यांची ...
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षांमध्ये राजेगाव (ता. दौंड) येथील भूषण भरत जाधव यांची अखिल भारतीय स्तरावरील १०७ (रँक) व्या क्रमांकाने निवड झाली आहे. भूषणच्या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नुकताच नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजनाताई कुल, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पराग जाधव, शहाजी जाधव, मदन जाधव, सुरेश कदम, मालोजी मोरे, मुकेश गुणवरे, सागर जाधव आणि ग्रामस्थ आदींनी गुणगौरव केला.
ग्रामीण भागातले आणि शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांने मिळवलेले यश म्हणून याकडे पाहिले जात आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन केले जात आहे. भूषण जाधव यांचे वडील भरत जाधव हे शेतकरी आहेत. भूषण प्राथमिक शिक्षणापासूनच गुणवंत विद्यार्थी म्हणून पुढे आलेला होता. त्याचे शिक्षण सैनिकी शाळेत झालेले आहे. इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यासाठी पुणे तसेच दिल्ली या ठिकाणी राहून अभ्यास केला. दरम्यानच्या काळात त्याने राज्यशास्त्र - लोकप्रशासन विषयात दिल्ली येथे एम. ए. ही पदव्युत्तर पदवी पूर्ण करून राज्यशास्त्र विषयात नेटची परीक्षा यशस्वीपणे पार केली.
--
फोटो ०९राजेगाव भूषण जाधव