शेतकऱ्याचा मुलगा नोकरी देणारा हवा- महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:09 AM2019-01-21T02:09:48+5:302019-01-21T02:10:03+5:30
शेतक-यांच्या मुलांनी नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारा शेतक-याचा मुलगा बनला पाहिजे.
नसरापूर : शेतक-यांच्या मुलांनी नोकरी मागण्यापेक्षा, नोकरी देणारा शेतक-याचा मुलगा बनला पाहिजे. उच्चशिक्षित होऊन एखाद्या कंपनीत मॅनेजर होण्यापेक्षा जर त्या मुलाने बेस्ड कंपनी काढून रोजगारनिर्मिती केली पाहिजे, असे आवाहन मंत्री महादेव जानकर यांनी कापूरहोळ येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या मंडप शुभारंभ प्रसंगी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भोर येथे यावर्षी राज्यस्तरीय बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन भोर-वेल्हा-मुळशी सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व विकास प्रतिष्ठान बळीराजा प्रतिष्ठान व जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने दिनांक २३ ते २७ रोजी होणार आहे.
या वेळी महादेव जानकर यांच्या समवेत भोर प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार पाटील, बीडीओ संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे, जि. प. सदस्य शलाका कोंडे, निशा सपकाळ, सुभाष सुतार,कापूरव्होळचे सरपंच किरण गाडे, धाराऊ माता ट्रस्टचे अध्यक्ष अमित गाडे,योगेश गाडे, महेश कोंडे, राजेंद्र इंगुळकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी झालेल्या चार कृषी प्रदर्शनामुळे शेतकºयांना आपल्या शेतमालाचे योग्य मूल्य, खरेदीभाव, शेतीजन्य विषयांचा अभ्यास करता आला असे या बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
यावेळी जानकर यांना येणाºया लोकसभेत उभे राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी होकारार्थी मान दर्शवत शिवसेना व भाजपाची युती होणारच आहे. आरपीआय आणि रासपा यांच्या बरोबरच राहणार आहे, असा पुनरुच्चार यावेळी केला.