दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर, शेतकरी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:03 AM2018-09-25T01:03:33+5:302018-09-25T01:03:36+5:30
ओतूर परिसरातील ओतूर, अहिनवेवाडी, चार पडाळी, सारणी, तांबेमळा, ढमालेमळा आदी ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले व कळपाने फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे .
ओतूर - परिसरातील ओतूर, अहिनवेवाडी, चार पडाळी, सारणी, तांबेमळा, ढमालेमळा आदी ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले व कळपाने फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे .
ओतूर परिसरातील अमिर घाट येथे दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता उसाशेजारील शेतात मेंढपाळ मेढ्या चारत होते तेव्हा या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला कळपातील एका मेंढीला जखमी करून एक मेंढा ठार केला व बिबट्या मेंढा घेऊन पळाला. मेंढपाळांनी आरडाओरडा केल्याने तेथील स्थानिक शेतकरी भरत शेटे धावत आले इतर शेतकरी ही धावत आले मेंढपाळ व शेतकऱ्यांनी बिबट्या ज्या दिशेने पळाला त्याचा पाठलाग केला तेव्हा एका शेतात बिबट्याचा घोळकाच दिसल्यावर ते थांबले आरडाओरडा केली तेव्हा दोन बिबटे दोन बछडे उसाच्या शेतात पळाले.
या घटनेची माहिती ओतूर वनविभागाला कळविण्यात आली. वनविभागाचे विशाल अडागळे वनमजूर फुलचंद खंडागळे तेथे तत्काळ हजर झाले. पंचनामा करतांना तेथे बिबट्याचे पायांचे ठसे दिसून आले. जुन्नर तालुक्यातील सोशल मीडियावर पट्टेरी वाघाची बातमी मेसेज फिरताना दिसून येतो. तसेच बिबट्यापासून संरक्षण असा व्हिडीओ दाखवले जात आहेत. या विभागात पट्टेरी वाघ नाही वाघसदृश तरस असावे. सोशल मीडियावर जे दाखवले जाते त्यामुळे दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वनविभागाचे कर्मचारी म्हणाले. या परिसरातील शेतकरी भरत शेटे म्हणाले बिबट्याच्या दहशीतीमुळे शेतमजूर कामाला येत नाहीत, दिवसा बिबट्या हल्ले करू लागले आहेत ते झुंडीने फिरतात कधी एक कधी दोन तर कधी जोडीने बछडे दिसतात वन विभागाने पिंजरा लावावा.
सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश डुंबरे म्हणाले, वनविभागाने बिबट्या पासून संरक्षण याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. कारण या विभागात अनेक हल्ले झाले आहेत. बनकर फाटा ते बल्लावाडी गणपती फाटा येथे दुचाकीवरून जाणाºया चालक महिला यांना गंभीर जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
वनविभागाने बसविला विठ्ठलवाडीत बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा
तळगाव ढमढेरे : विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील मिरगव्हाण वस्तीवर ग्रामस्थांच्या मागणीवरून वनविभागाने अखेरीस बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला. गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील मिरगव्हाण वस्तीवर उच्छाद मांडला होता. दोन कुत्री व शेळी खावून फस्त तर केली होती.
बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे मिरगव्हाण परीसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते .मारुती धोंडीबा गवळी यांच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केला परंतु तिने प्रतिकार केल्याने ती बचावली. विकास कोंडीबा कातोरे यांच्या शेतामध्ये एका पाळीव कुत्र्याचे अवशेष आढळून आले तर दिलीप हंबीर यांच्या गोठ्यातून एक शेळी बिबट्याने फस्त केली. किरण कातोरे यांच्या कुत्र्यावरही हल्ला करून त्याला मारले होते. मिरगाव वस्तीवरील अशोक चव्हाण हे रात्रीच्या वेळी शेताचे काम उरकून ट्रॅक्टरने घरी येत असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच दीपक गवारी, योगेश गवारे, गुरुनाथ गवारी यांनाही या बिबट्याचे दर्शन झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाने याची दखल घेत मिरगाव परिसरात पिंजरा लावला. यावेळी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष अंकुश गवारी, युवराज कातोरे, दीपक गवारी, उद्धव गवारी, सोपान हंबीर, भूषण गवारी, अप्पासोा कातोरे, चंद्रशेखर कातोरे, वनकर्मचारी बाबा घोलप आदी उपस्थित होते.