शेतकरी त्रस्त, कर्जमाफी अर्जाच्या तांत्रिक त्रुटी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:44 AM2017-08-28T01:44:22+5:302017-08-28T01:44:38+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या तांत्रिक अडचणी कायम आहेत. महा-ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र तसेच सीआरसी सेंटर्स अशा केंद्रांमधून हे अर्ज भरून घेतले जात आहे

Farmers suffer technical difficulties, debt forgiveness applications | शेतकरी त्रस्त, कर्जमाफी अर्जाच्या तांत्रिक त्रुटी कायम

शेतकरी त्रस्त, कर्जमाफी अर्जाच्या तांत्रिक त्रुटी कायम

Next

कोरेगाव मूळ : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या तांत्रिक अडचणी कायम आहेत. महा-ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र तसेच सीआरसी सेंटर्स अशा केंद्रांमधून हे अर्ज भरून घेतले जात आहे. परंतु वारंवार होणाºया सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरताना विलंब होत आहे. अनेक ठिकाणी खातेफोड, सातबारा उतारावर समाविष्ट असलेल्या कुटुंबांतील सदस्यांनी विविध वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज यामुळे अर्ज भरताना शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी कर्ज घेणाºया शेतकºयाचा मृत्यू झाला असून, त्याच्या वारसाचे नाव सातबारा उतारावर नाव लागले नसल्याने कर्जमाफी द्यायची कशी ? असा प्रश्न भेडसावत आहेत.
लेखी अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेसही शेतकºयांचा पुरेसा प्रतिसाद नाही. आॅनलाइन एक अर्ज भरण्यास तब्बल १५ ते २० मिनिटे जात असल्याने तसेच त्यादरम्यान इंटरनेट सर्व्हर डाऊन असणे, त्याला गती नसणे, वीजपुरवठा बंद असल्यास इंटरनेटही बंद असण्यासारखे प्रकार होत आहे. यामुळे हे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची उत्सुकताही कमी होऊ लागली आहे. कर्जमाफी अर्ज भरताना आधार नंबर व त्याला मोबाईल लिंकिंगही गरजेचे आहे. काही शेतकºयांचे मोबाईल आधार लिंक नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. अनेकांकडे नवे मोबाईल असल्याने व त्यांचे आधार लिंकिंग झाले नसल्याने अशांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांचे आॅनलाइन लिंकिंग करण्यासाठी पीओएस मशिन देण्यात आलेले आहेत. परंतु पीओएस मशीनमध्येही त्रुटी येत असून, अंगठ्याचे ठसे कनेक्ट होत नाहीयेत.


राजगुरुनगरला ठसे यंत्रणेत बिघाड
राजगुरुनगर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आधार
देणारी कर्जमाफी शेतकºयांसाठी डोकेदुखी असल्याचे चित्र दिसत आहे. आधार
कार्ड लिंक करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांचे बोटांचे ठसे फिंगर प्रिंट रीडर यंत्रावर जुळत नसल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे तीन तसेच चºहोली, आळंदी, मरकळ, शेल पिंपळगाव, चाकण, खराबवाडी, म्हाळुंगे, चास, वाडा येथे महा-ई-सेवा केंद्रे आहेत. या महा-ई-सेवा केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत.
कधी सर्व्हर डाऊन तर कधी इंटरनेट बंद,
अशा असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे.
त्यामुळे शेतकºयांना दिवसभर उपाशी-तापाशी रांगेत उभे राहावे लागत आहे. सन २०११ ते २०१४ या कालावधीत ज्या व्यक्तींनी आधारकार्ड
काढले आहे, अशा ग्राहकांचे बायोमेट्रिक
अपडेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले आधारकार्ड त्याच व्यक्तीचे आहे की
नाही हे ठामपणे सांगता येत नाही. अनेकांना
लिंक करण्यात अडचणी येत आहे. हे कार्ड दिलेल्या मुदतीत लिंक न झाल्यास पीककर्ज
माफ होईल की नाही अशी भीती शेतकºयांना वाटत आहे.
राजगुरुनगर शहरातील आधार कार्ड काढण्याची केंद्र बंद झाली आहे.
त्यामुळे शेतकºयांना चाकण (ता. खेड) येथे
आधार काढण्यासाठी जावे लागते.
शेतातील कामधंदा सोडून महिला व शेतकºयांना काम तर होत नाही; मात्र
हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र दिसत
आहे.


अटीप्रमाणे सन २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दि़३० जून २०१६ पर्यंत पूर्ण परतफे ड केलेल्या शेतकºयांनी २०१६-१७ वर्षात घेतलेल्या कर्जाची दि़३१ जुलै २०१७ पर्यंत परतफे ड केल्यास त्यांना सन २०१५-१६ या वर्षामधील परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५००० हजार रुपयांपर्यंत यापैकी जी कमी असेल, ती रक्कम शेतकºयांना देण्यात येणार आहे. मात्र, ही रक्कम किमान रुपये १५ हजार रुपये असेल. तथापि शेतकºयांना कर्जांची पूर्णत: परतफे ड केलेली रक्कम रुपये १५ हजारांपेक्षा कमी असल्यास अशी संपूर्ण रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे़
या अटीनुसार एखाद्या शेतकºयाने सन २०१५-१६ या वर्षात कर्ज घेतले आणि त्याचे निधन झाले, तर त्या खात्यावरील कर्जाची परतफेड दि़३० जून २०१६ पर्यंत त्याचा वारसदार करेल आणि २०१६-१७ मध्ये त्यांचा वारसदार हा पीक कर्ज घेणारा नवीन खातेदार ठरेल़
शासन निकषानुसार तो नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना जी २५००० हजार व किमान १५००० च्या मिळणाºया रकमेच्या अटीत तो शेतकरी बसत नाही. ज्यांच्या पालकांचे २०१५-१६ वर्षात निधन झाले असेल, तर ते खातेदार सतत २ वर्षे नियमित कर्ज भरत नाहीत़ कारण, सन २०१५-१६ या वर्षात वडील किंवा आई कर्जदार असते तर २०१७ वर्षात त्यांचे वारसदार हे नवे खातेदार होत असल्यामुळे कर्जमाफी फायद्यापासून ते वंचित राहतील.

Web Title: Farmers suffer technical difficulties, debt forgiveness applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.