शेतीला आवर्तन न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 08:11 PM2018-04-22T20:11:35+5:302018-04-22T20:11:35+5:30

जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी) यांनी  विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Farmer's suicide in Pune District | शेतीला आवर्तन न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या   

शेतीला आवर्तन न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या   

Next

पुणे -  जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी) यांनी  विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस जबाबदार असणाºयावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यामध्ये जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

वालचंदनगर पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीसाठी लागणाºया रासायनिक खतांचे दुकान आहे. लासुर्णे व बेलवाडी परिसरामध्ये त्यांची शेती आहे. शनिवारी (दि. २१) रोजी लासुर्णे येथील दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. रविवारी (दि. २२)रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा आढळून आला. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातुन बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्ठया आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाल्याने कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी होले,महेंद्र फणसे करीत आहेत. 

मंत्र्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

 नीरा डाव्या कालव्यातून गेल्या वर्षी व य वर्षी उन्हाळी हंगामचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.

सरकारच्या विरोधात आवाज उठवावा 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर,मार्केट कमिटीचे माजी संचालक अनिल पवार,  दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी शेतीसाठी पाणी प्रश्नावरून सरकारच्या विरोधात आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.

रास्ता रोकोचा दिला होता इशारा 

जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभरामुळे निरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळण्यास विलंब होत असल्यामुळे वसंत पवार व परिसरातील शेतक-यांनी १३ एप्रिल रोजी लासुर्णे जवळील चिखली फाटा येथे ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेस पाणी सोडण्यासाठी रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी ४२ व ४३ क्रमांकांच्या वितरिकेस १७ व १९ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्याप या दोन्हीही वितरिकेस पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे या परीसरातील सात हजार एकरातील पिके जळण्याच्या  मार्गावर आहेत.

 पवार यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या दोन चिठ्ठ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये आत्महत्येस मंत्र्यांना जबाबदार धरावे, असा उल्लेख आहे. या आत्महत्येबाबत योग्या ती काळजी  घेऊन तपास करण्यात येत आहे. 

- उत्तम भजनावळे, सहायक पोलिस निरिक्षक, वालचंदनगर पोलिस ठाणे

Web Title: Farmer's suicide in Pune District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.