शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले; मनोरमा खेडकरांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:55 PM2024-07-22T17:55:48+5:302024-07-22T17:58:00+5:30

मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती

Farmers threatened at gunpoint Manorama Khedkar now in 14 days judicial custody | शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले; मनोरमा खेडकरांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले; मनोरमा खेडकरांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी तुरुंगामध्ये असलेल्या वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे

मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर व त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवले होते. या प्रकरणी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर( वय ६५ वर्ष) यांच्या कडून १२ जुलैला पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. तेव्हा त्या तक्रारीनंतर फरार झालेल्या मनोरमा खेडकर यांना गुरुवारी १८ जुलैला पुणे ग्रामीण अन्वेषण शाखा व पौड पोलिसांच्या वतीने संयुक्तरीत्या कारवाई करत महाड येथून अटक करण्यात आली होती. 

या अटकेनंतर त्यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये आणून अटकेची सर्व प्रक्रिया पूर्ण करीत त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तेव्हा ती कोठडी शनिवारी (20 जुलै) रोजी संपल्यावरती त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता  न्यायालया कडून त्यांना दोन दिवसांची (२२ जुलै) पोलीस कोठडी देण्यात आली होती. 

तेव्हा ही पोलीस कोठडी

सोमवार (दिनांक 22 जुलै)/रोजी संपली असता त्यांना पौड न्यायालया समोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Farmers threatened at gunpoint Manorama Khedkar now in 14 days judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.