उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचा पालखी महामार्गाला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:16+5:302021-05-23T04:10:16+5:30

आधी मागण्या पूर्ण करा उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची ...

Farmers in Undwadi Kadepathar continue to oppose the Palkhi Highway | उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचा पालखी महामार्गाला विरोध कायम

उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचा पालखी महामार्गाला विरोध कायम

Next

आधी मागण्या पूर्ण करा

उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची भूमिका उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

संत तुकाराम महाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरण भूमिसंपादनासाठी सरसरी प्रतिगुंठा ४ लाख २५ हजार दर निघाला असला तरी उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचे ज्यादाचे क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील गावातील शेतकऱ्यांना प्रतिगुंठा केवळ ७१ हजार ९९९ दर शासनाच्या वतीने काढल्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. या कारणास्तव मागील दोन दिवसांपूर्वी उंडवडी कडेपठार येथील शेतक-यांनी मोजणीला विरोध करून मोजणी बंद पाडली होती.

जराडवाडी येथील शेतकऱ्यांनी नोटीस मिळाल्यासून सर्व कागपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केला. त्याचबरोबर यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन वेळी शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी प्रांताधिकारी यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु आज ११ महिने होऊन देखील मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी देखील मोजणी बंद पाडली होती.

उंडवडी कडेपठार गावच्या शेतकऱ्यांचे इतर गावांपेक्षा सर्वाधिक ११.९७ आर क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील त्यांना मिळालेल्या ७१ हजार ९९९ रुपये मोबदल्यापेक्षा इतर गावांना जवळपास ६ पट ज्यादा मोबदला मिळाल्यामुळे फक्त उंडवडी कडेपठार गावासाठीच असा दर का? असा प्रश्न शेतक-यांचा आहे. शेतक-यांवर झालेल्या अन्यायामुळे शेतकरी संतप्त आहेत.

संबधित शेतक-यांच्या मागण्या...

इतर गावांच्या तुलनेत उंडवडी कडेपठारच्या जमिनीचा मोबदला मिळावा. जराडवाडीतील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील बाजूस क्षेत्रास एकसमान मोबदला मिळाला. परंतु उंडवडी कडेपठारमधील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील क्षेत्रास वेगवेगळा मोबदला का? तो ही एकसमान मिळावा. भूसंपादीत झालेल्या जमिनीच्या क्षेत्रातील बांधकाम, विहिरी, बोरवेल, पाईपलाईन, फळझाडे, शेततलाव, पोल्ट्री, मंदीर तसेच इतर पंचनामे अनेकदा कळवून देखील ते पंचनामे झाले नाहीत. त्वरित हे पंचनामे करावेत. जर वरील सर्व बाबींची पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय पालखी महामार्गाच्या कामास आम्हा सर्व शेतकऱ्यांचा पूर्णपणे कायम विरोध राहील, असे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Farmers in Undwadi Kadepathar continue to oppose the Palkhi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.