पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:34 PM2019-06-25T18:34:07+5:302019-06-25T18:34:41+5:30

आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करली नसली तरी, पेरणीला विलंब होत असल्याने त्यांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  

Farmers Waiting for the rain | पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा 

पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : जिल्ह्यात काही भागांत पहिल्याच पावसानंतर खरीपाच्या पेरणीला शेतकºयांना सुरुवात केली असून, आसेगाव परिसरातही दोन टक्क्यांच्या जवळपास पेरणी उरकली आहे. आता चार दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने पेरणी करणाºया शेतकºयांवर चिंतेचे ढग दाटत आहेत. दरम्यान, आसेगाव परिसरातील बहुतांश शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करली नसली तरी, पेरणीला विलंब होत असल्याने त्यांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.  
आसेगाव परिसरात शेतकºयांनी खरीपाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करून बियाणे, खतांची खरेदी करून ठेवली आहे. त्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चांगला पाऊस पडला. तथापि, उन्हाळ्यात झालेली जमिनीची धूप या पावसामुळे कमी झाली नाही. अशात खरीपाची पेरणी उलटून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी दमदार पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. तथापि, परिसरातील एक ते दोन टक्के शेतकºयांनी मात्र पेरणीला सुरुवात केली आहे. आसेगाव परिसरात २४ जुनपासून आकाशात ढग दाटून येत असले तरी, पाऊस मात्र पडत नसल्याने पेरणी उरकणारे शेतकरी चिंताग्रस्तही आहेत. आता दोन दिवसांत पाऊस पडल्यास पेरणी करणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार असून, जमिनीची धूप कमी होण्याची प्रतिक्षा करणाºया शेतकºयांनाही दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे. 
 
अल्पभूधारक करीत आहेत स्वत:च मशागत
आसेगाव परिसरात २२ आणि २३ जुन रोजी पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जमिन असलेल्या काही शेतकºयांनी तात्काळ मशागत पूर्ण करून पेरणीही केली; परंतु आता पेरणीची वेळ तोंडावर असून, अल्पभूधारक शेतकºयांकडे यंत्रांवर खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने हे शेतकरी हातचलित अवजाराने शेतात वखरणी करून पेरणीसाठी सºया पाडत असल्याचे चित्र आसेगाव परिसरात पाहायला मिळत आहे.

Web Title: Farmers Waiting for the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.