शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:39+5:302021-06-26T04:09:39+5:30
तालुक्यात मोसमी पावसाची विषमता आहे. पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने भात पिकाचे उत्पादन घेतले जाते तर मध्य भागात ...
तालुक्यात मोसमी पावसाची विषमता आहे. पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने भात पिकाचे उत्पादन घेतले जाते तर मध्य भागात पाण्याचे उपलब्धतेने नगदी पिकांचे उत्पादन अधिक होते. पूर्व भागात मात्र खरीप पिकांचे क्षेत्र अधिक आहे. विशेष म्हणजे या भागातील पठारभागात खरीपात वाटाणा पिकाचे हमखासपणे उत्पादन घेतले जातात. दरम्यान पूर्व भागातील आळेफाटा, वडगाव आनंद, आळे, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, बोरी, बेल्हा व गुंजाळवाडी, गुळुंचवाडी व पठारभागावरील आणे, पेमदरा, शिंदेवाडी नळावणे आदि गावांमध्ये पूर्व मोसमी पावसाचे ओलीवरच शेतात मशागतींना सुरुवात केली. यानंतर काही ठिकाणी बाजरी, भुईमूग, मका, मुग, तुर, वाटाणा, सोयाबीन या पिकांच्या धुळवाफेवर पेरण्या केल्या तर पाऊस पडेल या अपेक्षेने काही प्रमाण पेरण्या झाल्या नाहीत. पूर्व भागात मोसमी पावसाचे आगमन वेळेत झाले मात्र आजपर्यंत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. मोसमी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.