पुरंदर उपशाच्या पाण्याने शेतकऱ्यांनी केली जलक्रांती

By Admin | Published: January 15, 2017 05:32 AM2017-01-15T05:32:43+5:302017-01-15T05:32:43+5:30

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी

Farmer's water revolution with puran rains | पुरंदर उपशाच्या पाण्याने शेतकऱ्यांनी केली जलक्रांती

पुरंदर उपशाच्या पाण्याने शेतकऱ्यांनी केली जलक्रांती

googlenewsNext

- मामासाहेब गायकवाड,  भुलेश्वर
पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी स्वत: शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन पाईपलाईनद्वारे पाणी नेऊन नाले, ओढे, तळी भरत आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने या परिसरात जलक्रांती झाली आहे.
पुण्यातील रोजचे वापरात येणारे पाणी मुळा-मुठा नदीद्वारे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. पुण्याची लोकसंख्या पाहता हे पाणी उन्हाळ्यातही पाहिजे त्या प्रमाणात मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात शिंदवणे घाट चढून पुरंदर तालुक्यात येते. घाटुळीआई देवीनजीक योजनेचे पाणी डोंगराशेजारी सोडण्यात येते. मुळात पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार करतानाच ठिबक सिंचन योजनेद्वारे पाणी वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. योजनेची मुख्य लाईन झाल्यानंतर या योजनेची अनेक कामे बाकी आहेत. काही वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या योजनेचे पाणी पाईपलाईननजीक सोडून नाले, माती बांधतळी, गावतळी भरल्याने पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याची पातळी चांगल्या प्रकारे वाढली. विशेष म्हणजे काही गावांचे दरवर्षीच लागणारे टँकर मागणीअभावी बंद झाले. हे पाणी सुरळीत सुटल्याने पुरंदरच्या शेतकऱ्यांचे बारमाही बागायतदार बनण्याचे स्वप्न काही अंशी पूर्ण झाले. ही योजना ठिबक सिंचनची असल्याने वाघापूरपासून डोंगराकडे न जाता एक ते दीड किलोमीटर अलीकडे घेण्यात आली. यामुळे या योजनेच्या पाईपलाईनपासून दोन्हीकडील क्षेत्र या पाण्यापासून वंचित राहिले, ते आजपर्यंत. पिसर्वे गावानजीक योजनेची पहिली ठिबक सिंचनाची सोसायटी करण्यात आली. मात्र तांत्रिक बाबीमुळे ती सुरू होऊ शकली नाही. यामुळे उर्वरित कामे पूर्ण न होता ही योजना आजतागायत पहिल्यासारखीच सुरू आहे. म्हणून प्रत्येक गावातील काही भागाला पाणी मिळाले तर काही भाग या योजनेपासून वंचित राहिला. यामुळे या योजनेत कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झाली.
आपल्यालाही पुरंदर उपसाचे पाणी मिळावे यासाठी योजनेच्या लाईनपासून दोन ते तीन किलोमीटरवर असणारे नाले, तळी भरण्यासाठी सध्या शेतकरी एकत्र आले आहेत. स्वत: लोकवर्गणी करुन बारा ते पंधरा लाखांची पाईपलाईन करुन मातीबांध भरत आहेत. यासाठी योजनेचे अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. यामुळे योजनेपासून दूर असणाऱ्यांनाही सध्या पाणी मिळत आहे. स्वत: पाईपलाईनचा खर्च करुन पाणी मिळत असल्याने दूरवरचे शेतकरीही सुखावले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वत: पैसे योजनेच्या लाईनपासून ज्या ठिकाणी योजना पोहोचली नाही त्या ठिकाणी पाणी नेले आहे. पुरंदर उपसा योजनेमुळे येथील शेतकरी सधन झाला आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरुन विविध पिके घेत आहेत. यामुळे उसाची पिकेही घेऊ लागला आहे.

Web Title: Farmer's water revolution with puran rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.