कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी झाला हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:47 AM2019-02-05T00:47:45+5:302019-02-05T00:47:59+5:30
परिसरात कांदा काढणीला वेग आला असून कांद्याला योग्य भाव नसल्याने व वारंवार कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
चाकण - परिसरात कांदा काढणीला वेग आला असून कांद्याला योग्य भाव नसल्याने व वारंवार कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला हमीभाव मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चाकण परिसरात कांदा काढणीला वेग आला असून, चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा जनावरांच्या बाजारात ठेवावा लागत आहे. चाकण बाजारात २० हजार ९० क्विंटल आवक झाली आहे. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ७५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात मोठी नाराजी आहे. चाकण परिसरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेत आहे. यावर्षी चांगला भाव मिळेल अशी आशा शेतक-यांमध्ये होती, पण सध्याच्या भाजपा सरकारने शेतकºयांची घोर निराशा केली आहे, अशी शेतकºयांनी भावना व्यक्त केली आहे.
यावर्षी कांदा लागवड करण्यासाठी रोपांचा तुटवडा असतानाही चाकण परिसरातील शेतकºयांनी कांदा रोप तयार करून व महागडी रोपे घेऊन कांदा लागवड केली. चाकण बाजारात प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने भावात घसरण होत आहे.
भोरला कांदा उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडले
नेरे : आज ना उद्या कांद्याचा बाजारभाव वाढेल, या आशेवर भोर तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन-तीन वर्षांत कांद्याचे भरघोस पीक घेत होते. मात्र गेले दोन वर्षांपासून कांद्याला योग्य तो बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून शेतकºयांचे अर्थकरण कोलमडले आहे.
गतवर्षी शेतकºयांनी काढलेला कांदा साठवणूक करून ठेवला होता. या वेळी तरी बाजारभाव वाढतील ही आशा शेतकºयांना होती. मात्र आजची परिस्थिती पाहता शेतकºयांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. त्यातूनच नवीन कांद्याची आवक चालू झाल्याने जुन्या कांद्याला कोणी विचारणासेही झाले आहे. नवीन कांदा चाळीस ते पन्नास रुपये तर जुना कांदा २० ते ३० रुपये १० किलो दराने बाजारात विकला जात आहे.मागील तीन वर्षांपूर्वी दहा किलोला ११० ते १४० रुपये भाव मिळाला होता.
गतवर्षी शेतकºयांनी जास्तीत जास्त कांदा लागवड केली होती. मात्र बाजार घसरल्याने शेतकºयांच्या आशाच्या निराशा होऊन बसल्या आहेत. शासनाने कांदा निर्यातीकडे लक्ष देणे गरजेचे असून, हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
कांद्याचे रोप, लागवड, औषधफवारणी, काढणी, वाहतूक हा सर्व खर्च वजा जाता दोन वर्षांपासून शेतकरी तोट्यात असल्याचे बाजारवाडी (ता. भोर) येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कृष्णा शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.