शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 06:08 AM2023-03-13T06:08:22+5:302023-03-13T06:09:11+5:30

पाणी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ पुरस्कार वितरण साेहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

farmers will get 12 hours of electricity per day and waste land to be leased for 30 years said dcm devendra fadnavis | शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे : शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी ॲग्रीकल्चर फिडर  सौरउर्जेवर आणण्यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांची पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पाणी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’चा पुरस्कार वितरण साेहळा रविवारी झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, यावर्षी ३० टक्के आणि पुढील दोन ते चार वर्षांत उर्वरित सर्व फिडर सौरऊर्जेवर आणण्यात येतील. हा पहिला प्रयाेग २०१७ साली राळेगणसिद्धीला यशस्वी झाला हाेता. ताे राज्यभर राबविण्यात येईल. 

आमिर खान म्हणाले, शेतीला  व्यवसायाच्या दृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे. यातील समस्यांवर मात करून पुढे जावे. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात.

यावेळी पाणी फाउंडेशनचे संस्थापक व चित्रपट अभिनेते आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, पद्मश्री पाेपटराव पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे ‘राज्यस्तरीय फार्मर कप २०२२’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. २५ लाखांचा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाने पटकाविला.

फार्मर कप स्पर्धेतील विजेत्यांची नावे

- प्रथम पुरस्कार : परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरूड, जि. अमरावती. 
रक्कम २५ लाख रुपये
- द्वितीय पुरस्कार : चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर.) 
रक्कम १५ लाख रुपये
- संयुक्त तृतीय पुरस्कार : जय याेगेश्वर शेतकरी गट, डांगर बुद्रुक, ता. अमळनेर.
रक्कम पाच लाख रुपये
- संयुक्त तृतीय पुरस्कार : उन्नती शेतकरी गट, वारंगा, ता. कळमनुरी, जि. हिंगाेली. रक्कम पाच लाख रुपये

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: farmers will get 12 hours of electricity per day and waste land to be leased for 30 years said dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.