साडेचार कोटी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार
By admin | Published: July 7, 2016 03:25 AM2016-07-07T03:25:01+5:302016-07-07T03:25:01+5:30
धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत असलेल्या व भोर तालुक्यातून गेलेल्या धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या अनुदानाची सुमारे ४ कोटी ५२ लाख
भोर : धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत असलेल्या व भोर तालुक्यातून गेलेल्या धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या अनुदानाची सुमारे ४ कोटी ५२ लाख ६४ हजार ४५५ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या बँकखात्यात आॅनलाइन जमा होणार आहे.
धोम बलकवडी प्रकल्प वाई (जि. सातारा) अंतर्गत धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी भोर तालुक्यातील ९ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमीन संपादित केल्या होत्या. यात बुडीत शेतकऱ्यांच्या जमिनीचे निवाडे अंतिम करून त्यांना धोम बलकवडी प्रकल्पाकडून उपविभागीय अधिकारी भूसंपादन क्र. २६ यांच्याकडे सुमारे ४ कोटी ५२ लाख ६४ हजार ४५५ रु इतकी अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून अनुदानाची रक्कम रेंगाळलेली होती.
धोम बलकवडी डावा कालवा भोर तालुक्यातून सुमारे साडेचौदा किलोमीटर लांबीचा असून, पहिल्या ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे.
उर्वरित ९ किलोमीटर लांबीमधील शेतकऱ्यांचे अनुदान देण्याचे काम प्रगतिपथावर असून, रक्कम लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
गावनिहाय मिळालेली अनुदान रक्कम
पळसोशी:२०,0४,४१५ रु
धोंडेवाडी:३५,२८,५०० रु
बाजारवाडी:२३,0६,९९६ रु
नेरे:५८,२२,९५२ रु
धावडी:२७,४०,९८३ रु
टिटेघर:९३,४८,३८६ रु
कर्नावड:२८,८३,४७० रु
म्हाकोशी:९,७५,९५२ रु
वडतुंबी:१,४३,६४,८९ रु
नेरे (२०११):१२,८८,७१२ रु