शेतीचे पाणी बंद; पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 12:40 AM2016-05-22T00:40:21+5:302016-05-22T00:40:21+5:30

पुरंदर तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बहुतेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे. तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील धरणांची पातळी दिवसेंदिवस अधिकच घटत आहे

Farming water closes; Water reservoir reserved for drinking | शेतीचे पाणी बंद; पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित

शेतीचे पाणी बंद; पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित

googlenewsNext

खळद : पुरंदर तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बहुतेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे. तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील धरणांची पातळी दिवसेंदिवस अधिकच घटत आहे. अशा स्थितीत सध्या तालुक्यात १६ गावे २ गावठाण व ९६ वाड्यांवर २१,४०२ लोकांना टँकरने पाणीपुरवठा चालू आहे.
ही बाब लक्षात घेऊन शेतीचे पाणी बंद करुन सर्व पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत, अशी माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
गराडे जलाशयात ६५.३७ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा होतो. पण आज रोजी ७.५६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यात गाळाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जवळपास जलाशय कोरडाच आहे.
घोरवडी जलाशातील पाणीसाठा ६.४१ दशलक्ष घनफूट शिल्लक राहिला आहे. पिलाणवाडी जलाशयाची ६९.२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता आहे. आता ८.५८ दशलक्ष घनफूट एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे. या जलाशयावर शिवरी प्रादेशिक योजना चालू आहे. १६ गावे, ९६ वाड्यांवर २१,४०२ नागरिकांना टँकरने पाणी
पुरंदर तालुक्यात वाल्हे २ टँकरद्वारे १६ वाड्यावस्त्या, पिंपरी एका टँकरद्वारे गावठाण व ४ वाड्यावस्त्या, मावडी क. प. एक टँकर ५ वाड्यावस्त्या, नायगाव एका टँकरद्वारे १० वाड्यावस्त्या, राख एका टँकरद्वारे गायरान व ७ वाड्यावस्त्या, माळशिरस २ टँकरद्वारे १६ वाड्यावस्त्या, राजुरी एका टँकरद्वारे ५ वाड्यावस्त्या, रिसे एका टँकरद्वारे ३ वाड्यावस्त्या, टेकवडी एका टँकरद्वारे ३ वाड्यावस्त्या, मावडी सुपे व भोसलेवाडी एका टँकरद्वारे ५ वाड्यावस्त्या, साकुर्डे एका टँकरद्वारे ७ वाड्यावस्त्या, बेलसर व खानवडी एका टँकरद्वारे ५ वाड्यावस्त्या, दिवे एका टँकरद्वारे ३ वाड्यावस्त्या, जेजुरी ग्रामीण एका टँकरद्वारे ६ वाड्यावस्त्या असा पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.

Web Title: Farming water closes; Water reservoir reserved for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.