फरांदे अ‍ॅकॅडमीला विजेतेपद

By Admin | Published: May 12, 2017 05:31 AM2017-05-12T05:31:10+5:302017-05-12T05:31:10+5:30

रोहित हाडके (३/१९ व ३८), ओम फरांदे (४/२९), रौनक हरफाळे (५३) यांच्या खेळामुळे फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने अंतिम सामन्यात

Faronday Akademi wins title | फरांदे अ‍ॅकॅडमीला विजेतेपद

फरांदे अ‍ॅकॅडमीला विजेतेपद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रोहित हाडके (३/१९ व ३८), ओम फरांदे (४/२९), रौनक हरफाळे (५३) यांच्या खेळामुळे फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने अंतिम सामन्यात स्टेडियम क्रिकेट क्लबचा ७ गडी राखून पराभव करीत फरांदे करंडक १६ वर्षांखालील अंतरअ‍ॅकॅडमी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित पूना क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये स्टेडियम क्रिकेट क्लब संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४.४ षटकांत १० गडी बाद १०६ धावा केल्या. स्टेडियम संघाकडून अखिलेश गवाली २८ व करण स्वामी २१ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर शंभर धावांचा टप्पा गाठला. फरांदे संघाकडून ओम फरांदे (४-२९) व रोहीत हाडके (३-१९) यांनी गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. हे आव्हान फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २०.१ षटकांत व ३ गडी गमावून पूर्ण केले. रोहीत हाडके (३८) व रौनक हरफाळे (५३) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक अभिजित फरांदे यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिके : सर्वोत्कृष्ट फलंदाज : यश जगदाळे (फरांदे सीए); सर्वोत्कृष्ट गोलंदाज : सार्थक वाळके (फरांदे सीए); अष्टपैलू खेळाडू : आदित्य मोरे (क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमी); मालिकावीर : ओम फरांदे (फरांदे सीए).
संक्षिप्त धावफलक : स्टेडियम क्रिकेट क्लब : २४.४ षटकांत सर्वबाद १०६ (अखिलेश गवाली २८, करण स्वामी २१, ओम फरांदे ४-२९, रोहीत हाडके ३-१९) पराभूत वि. फरांदे क्रिकेट अ‍ॅकॅ डमी: २०.१ षटकांत ३ गडी बाद ११० धावा (रोहित हाडके ३८, रौनक हरफाळे ५३, सनथ परदेशी १-१३); सामनावीर: रोहित हाडके (फरांदे सीए)

Web Title: Faronday Akademi wins title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.