विक्रम फडणीस यांच्यासोबत फॅशन गप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:13 AM2017-08-03T03:13:47+5:302017-08-03T03:13:48+5:30
फॅशनच्या वलयांकित जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी लोकमत सखी प्रिव्हिलेज क्लबच्या सखींना उपलब्ध झाली आहे.
पुणे : फॅशनच्या वलयांकित जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी लोकमत सखी प्रिव्हिलेज क्लबच्या सखींना उपलब्ध झाली आहे. अ-हानाज रोझरी गु्रप आॅफ इन्स्टिट्युट प्रस्तुत आणि बेलमॅक रेसिडन्सीतर्फे प्रायोजित ‘टेटे-इ-टेटे’ हा संवाद ४ आॅगस्ट रोजी जेडब्ल्यू मेरियट येथे रंगणार आहे. या वेळी फॅशन शो आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधला जाणार आहे.
फॅशन कशा प्रकारे अवलंबावी, या जगताचे नेमके नियम काय आहेत, फॅशन शो कशा प्रकारे आयोजित केले जातात, फॅशन डिझायनर कशा प्रकारे काम करतात, असा विविध विषयांवर महिलांना विक्रम फडणीस यांच्याशी संवाद साधता येणार आहे.
या कार्यक्रमासाठी इसास (ब्युटी पार्टनर), राठोड ज्वेलर्स (ज्वेलरी पार्टनर), आॅडी पुणे (लक्झरी पार्टनर), इन्स्पिरेशन (हेल्थ पार्टनर) यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. या वेळी विक्रम फडणीस कलेक्शनतर्फे फॅशन शोही आयोजित करण्यात आला आहे. फॅशन गप्पांपूर्वी फडणीस फॅशन जगतात करिअर करू पाहणाºया विद्यार्थ्यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरचे नवे कंगोरे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.