प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:56 PM2018-06-19T17:56:33+5:302018-06-19T20:12:26+5:30
प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे 62 व्या वर्षी ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने फॅशन जगतात माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे.
पुणे : प्रख्यात फॅशन डिझायनर दीपक शहा यांचे मंगळवारी सकाळी 5 वाजता निधन झाले. ते 62 वर्षांचे हाेते. अनेक सिनेकलाकारांसाठी त्यांनी कपडे डिझाईन केले हाेते. दीड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन ट्युमर झाला हाेता. पुण्यातील रुबीहाॅल क्लिनिकमध्ये उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची अाई, पत्नी, दाेन मुली असा परिवार अाहे.
दीपक शहा हे फॅशन जगतातील माेठे नाव हाेते. त्यांनी 1987 साली मुंबईमध्ये माेअरमिश्चिफ या नावाने त्यांचे दुकान सुरु केले. त्यांच्या अाकर्षक डिझाईन्समुळे अनेक सिनेकलाकार त्यांच्याकडून अापले कपडे डिझाईन करुन घेत असत. जॅकी श्राॅफ, सुनिल शेट्टी, अमिताभ बच्चन, सलमान खान, सचिन तेंडुलकर अश्या दिग्गजांसाठी त्यांनी काम केले. मुंबईनंतर त्यांनी पुणे अाणि दुबईतही त्यांचे दुकान सुरु केले. पुणेकरांना एक वेगळी स्टाईल देण्यात दीपक शहा यांचा माेठा वाटा अाहे. दीड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर रुबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचार सुरु हाेते. त्यांच्या जाण्याने फॅशन जगतात माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे.
सुरुवातीपासून दीपक शहा यांच्यासाेबत काम करणारे त्यांच्या माेअरमिश्चिफचे मुख्य मास्टर सेबस्टिन डिकाेस्टा यांनी त्यांच्या अाठवणींना उजाळा दिला. जाेपर्यंत जीवंत असून ताेपर्यंत माेअरमिश्चिफला पुढे घेऊन जात राहू. दीपक शहा यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहू. त्यांनी त्यांच्या अायुष्यात माेठ्या कष्टाने वैभव उभे केले हाेते. त्यांच्या जाण्याने माेठी पाेकळी निर्माण झाली अाहे, अशी भावना डिकाेस्टा यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली.