फास्टॅगमुळे स्थानिकांना भुर्दंड, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:05+5:302021-02-23T04:15:05+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख म्हणाले, टोलनाक्यांवर टोल वसुलीसाठी करण्यासाठी आता ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ही ...

Fastag warns locals of agitation | फास्टॅगमुळे स्थानिकांना भुर्दंड, आंदोलनाचा इशारा

फास्टॅगमुळे स्थानिकांना भुर्दंड, आंदोलनाचा इशारा

Next

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख म्हणाले, टोलनाक्यांवर टोल वसुलीसाठी करण्यासाठी आता ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ही सुविधा वाहनचालकांसाठी चांगली असली तरी त्याबाबत पूर्ण तयारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे टोलनाक्यांवर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही रांगा लागत आहे. याबाबत सर्व टोलचालकांनी तातडीने कार्यवाही करावी. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत भरारी पथके नेमून पाहणी करावी.

खासगी वाहनचालकांना अनेक टोलनाक्यावर टोलमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी फास्टॅगमधून येथेही पैसे जातात. वाहनचालकांना हे पैसे गेल्यावर समजते. याबाबतही रस्ते विकास महामंडळाने तातडीने कार्यवाही करावी, असे देशमुख यांनी सांगितले.

‘फास्टॅग’ नसलेली वाहने या मार्गिकेत आल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल केला जात आहे. त्यामुळे वादाचे प्रसंगही घडत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. याबाबत यंत्रणा तयार करून वाहनचालकांना होणारा मनस्ताप कमी करावा, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

Web Title: Fastag warns locals of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.