फास्टॅगचा तांत्रिक घोळ मिटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 05:45 AM2020-01-06T05:45:15+5:302020-01-06T05:45:19+5:30

राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल भरणा करण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Fastag's technical solution could not be missed | फास्टॅगचा तांत्रिक घोळ मिटेना

फास्टॅगचा तांत्रिक घोळ मिटेना

Next

पुणे : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल भरणा करण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अजूनही बहुतेक टोलनाक्यांवर फास्टॅग असूनही अनेकांना रोखीने टोल द्यावा लागत आहे. तर रोखीने पैसे देऊनही फास्टॅगमधून टोल जात असल्याच्या तक्रारी चालकांकडून केल्या जात आहेत. काहींच्या फास्टॅग खात्यातून जादा टोलवसुली होत आहे. या तांत्रिक अडथळ््यांमुळे अजूनही टोलनाक्यांवरील रांगांमधून वाहन चालकांची सुटका झालेली नाही.
१५ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्याबाबतची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही तांत्रिक घोळ संपताना दिसत नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तळेगाव टोलनाक्यावर अमेय हरदास यांच्या फास्टॅग खात्यातून १७३ ऐवजी ११६६ रुपये गेले. त्यानंतर खात्यात पुरेसे पैसे नसल्याने त्यांचे खाते बंदही झाले. त्यांनी बँकेसह राष्ट्रीय महामार्र्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली. विनीत अहलुवालिया, दिव्य शहा यांना रोख पैसे दिल्यानंतर पुन्हा फास्टॅगमधून पैसे गेल्याचा अनुभव आला. सचिन मोरे यांना शनिवारी पाटस मार्गावर टोलचे पैसे दोनदा द्यावे लागल्याचे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.
वाहनाला फास्टॅग असूनही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम मागितली जात आहे. त्यासाठी फास्टॅग खात्यात पुरेसे पैसे नाही, फास्टॅग स्कॅन होत नाही अशी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे रोख रक्कम देऊन टोल भरण्याशिवाय चालकांकडे पर्याय नसतो.

Web Title: Fastag's technical solution could not be missed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.