दापोडीत ट्रकने दुचाकीला कट मारल्याने भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: June 19, 2024 13:10 IST2024-06-19T13:05:31+5:302024-06-19T13:10:02+5:30
पिंपरी : ट्रकने दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकी ट्रकच्या चाकाला घासली गेली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दापोडी येथे ...

दापोडीत ट्रकने दुचाकीला कट मारल्याने भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
पिंपरी : ट्रकने दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकी ट्रकच्या चाकाला घासली गेली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दापोडी येथे सोमवारी (दि. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
जयकरण यादव असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक जयकरण यादव (२४, रा. काळेवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक चालक शाहिद आदम शेख (३३, रा. भिगवण, ता. दौंड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक यांचे वडील जयकरण यादव हे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्याहून काळेवाडी येथे घरी येत होते. दापोडी येथील संजना चायनीज समोर आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून आलेल्या ट्रकने जयकरण यांच्या दुचाकीला कट मारला. यामध्ये दुचाकी ट्रकच्या चाकाला घासली गेली. या अपघातात जयकरण हे रस्त्यावर पडले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.