पुण्यात कंटेनरचा भीषण अपघात, रिक्षा चक्काचूर, झाडही कोसळले; १ जण ठार ३ गंभीर

By श्रीकिशन बलभीम काळे | Published: September 29, 2022 10:14 AM2022-09-29T10:14:17+5:302022-09-29T10:15:17+5:30

हडपसरमध्ये मिक्सर कंटेनरने वाहनांना उडवले

Fatal accident involving mixer container in Pune; 1 person killed 3 seriously injured | पुण्यात कंटेनरचा भीषण अपघात, रिक्षा चक्काचूर, झाडही कोसळले; १ जण ठार ३ गंभीर

पुण्यात कंटेनरचा भीषण अपघात, रिक्षा चक्काचूर, झाडही कोसळले; १ जण ठार ३ गंभीर

Next

पुणे - शहरातील हडपसर येथे एका मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवले आहे. या भीषण अपघातात १ ठार तर तिघे जखमी  झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की कंटेनरने एका झाडाला धडकून पलटी झाला आहे. हे झाड कोसळून एका नागरिकांच्या अंगावर पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवले असून भीषण अपघातात १ ठार तर ३ जखमी झाले आहेत. पहाटे ६ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला आहे. हे झाड कोसळून एका नागरिकाच्या अंगावर पडला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. कंटेनर खाली रिक्षा आल्याने त्याचा चक्काचूर झाला. सध्या क्रेनच्या सह्याने कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हडपसर येथील गाडीतळ येथे हा अपघात झाला आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Fatal accident involving mixer container in Pune; 1 person killed 3 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.