नगर - कल्याण महामार्गावर एसटी - मोटरसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:43 IST2023-11-17T14:42:47+5:302023-11-17T14:43:30+5:30
दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला पिकअप झाला पलटी

नगर - कल्याण महामार्गावर एसटी - मोटरसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
ओतूर: नगर कल्याण महामार्गावर ओतूर येथील कोळमाथा येथे एसटीबस आणि मोटासायकल समोरा समोर आपघात होऊन मोटारसायकलवरील दोन तरुण एसटीबस जाऊन जागीच ठार झाल्याची माहिती ओतूर पोलीसानी दिली.
अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि.१७ रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास ऋषिकेश संदीप वायकर (वय २२, रा हिवरे खुर्द ता.जुन्नर जि पुणे,) ओमकार दत्तात्रय गाडेकर (रा. बोरबन पोस्ट घारगाव ता.सगंमनेर) हे कल्याण दिशेने मोटरसायकलवरून जात होते.त्यावेळी एसटीबस आळेफाट्याच्या दिशेने जात असताना ओतूर कोळमाथा येथे समोरासमोर भीषण अपघात होऊन तरुण जागीच ठार झाले. यावेळी पिकपने दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पीकअप चालकाने ब्रेक मारून पुढे जाऊन पलटी झाली. पिकप चालकही जखमी झाला आहे.
ओतूर परिसरातून अशी घटना घडल्यामुळे हळहळ वेक्त होत आहे. पिकपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची खबर मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.