मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:15 IST2023-01-03T15:14:30+5:302023-01-03T15:15:18+5:30
हा अपघात सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जण जखमी
लोणावळा :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तुंगार्ली गावाच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये तळेगाव येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि.२) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.
दीपक अशोक नाटक (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुल कैलास जाधव (वय २८, संत तुकारामनगर, पिंपरी), जालिंदर बापू पवार (वय ५१, रा. खंडोबा माळ पिंपरी), रोहन भगवान वाघमारे (वय २८, पिंपरी) हे तिघे जण जखमी झाले आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व जण मोटार कारमधून (क्रमांक एम. एच. १५ जेएक्स ९३८५) तळेगावच्या दिशेने जात असताना तुंगार्ली गावाच्या हद्दीत समोर जाणाऱ्या कंटेनरला मोटार कारची मागून जोरात धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.