नगर-कल्याण महामार्गावर भीषण आपघात; पीकपने घेतला दोघांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 21:05 IST2023-09-20T21:03:04+5:302023-09-20T21:05:56+5:30
ओतूर येथील कोळमाथा येथील घटना

नगर-कल्याण महामार्गावर भीषण आपघात; पीकपने घेतला दोघांचा बळी
ओतूर: नगर-कल्याण महामार्गावर ओतूर येथील कोळमाथा दत्तभेळ हॉटेल समोर पिकपने मोटरसायकल व घरी चालत जात असलेल्या मुलीचा अपघात होऊन मोटारसायकलवरील महिला व साईडपट्टी वरून चालत चाललेली मुलगी ठार झाल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
अधिक माहिती अशी की बुधवार दि.२० रोजी सायकाळी ६.३० च्या सुमारास ऋतुजा डुंबरे रस्त्याने घरी चालत तर गीताराम नामदेव तांबे व पत्नी सविता तांबे रा.ओतूर ता.जुन्नर हे आळेफाट्याच्या दिशेने मोटरसायकलवरून जात असताना भरधाव पिकप एम.एच.१४ के.ए ५१३७ कल्याणच्या दिशेने जात असताना ओतूर कोळमाथा येथील दत्तभेळ हॉटेल समोर भीषण अपघात झाला पिकप रस्ता सोडून दुसऱ्या दिशेला जाऊन पलटी झाली यात मोटर सायकलवरील महिला सविता गिताराम तांबे (वय ४५) व साईडपट्टी वरील मुलगी ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) जागीच ठार झाली असून गीताराम नामदेव तांबे जखमी झाले आहेत. पिकप वाहन निघोज येथील असून चालक पीकप जाग्यावर सोडून फरार झाला असून पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत. ओतूर परिसरातून अशी घटना घडल्यामुळे हळहळ वेक्त होत आहे.