पुणे -नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 महिलांच्या मुत्यूस कारणीभूत ठरलेला वाहनचालक अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:09 IST2023-02-15T17:09:00+5:302023-02-15T17:09:29+5:30
भीषण अपघातात ५ महिलांचा मृत्यु झाला व ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या

पुणे -नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 महिलांच्या मुत्यूस कारणीभूत ठरलेला वाहनचालक अखेर जेरबंद
राजगुरूनगर: पुणे -नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे (दि १३ रोजी ) रात्री १७ महिलांना ठोकर देऊन ५ महिलांच्या मुत्यूस कारणीभूत ठरलेला चालक व आपघातग्रस्त वाहन खेडपोलिसांनी ३६ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. कानिपनाथ बबन कड (वय २४ रा. संतोषनगर ,वाकी ता खेड ) असे वाहनचालक आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कानिफनाथ कड हा वाहन घेऊन पिंपरी फाटा येथे पैसे देण्यासाठी रात्री पाऊने अकरा वाजता येत होता. दरम्यान पुणे -नाशिक महामार्गवर रस्ता ओलंडणाऱ्या महिलांना वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ५ महिलांचा मृत्यु झाला व ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. वाहनचालक कड हा घटनास्थळावरून आपघातग्रस्त वाहन घेऊन फरार झाला होता. पोलिसांना वाहन चालकाबाबत कोणतीही माहीती उपलब्ध होत नव्हती. उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्यासाठी ५ पथके तयार होती. ते अपघात घडल्या ठिकाणापासुन चारही दिशेकडे शोध घेत होते. कानिफनाथ कड हा हेद्रुस (ता खेड ) येथील बच्चेवाडी येथे नातेवाईक देवीदास पाटीलबुबा बच्चे याच्या घराच्या कडेला वाहन लपून बसला होता. सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट आणि त्यांचय पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे आधारे माग काढुन आरोपीला अटक केली आहे.