विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गेला पिता–पुत्राचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:00+5:302021-07-27T04:12:00+5:30
बंद पडलेल्या विद्युत वाहिनी तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने ऊसाला औषध फवारणी करत असलेले यादव भिमाजी पटाडे ...
बंद पडलेल्या विद्युत वाहिनी तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने ऊसाला औषध फवारणी करत असलेले यादव भिमाजी पटाडे व श्रीकांत यादव पटाडे या पिता – पुत्राचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला . बोरी खुर्द ग्रामपंचायतीने२३ मार्च २०२१ रोजी लेखी पत्र विद्युत वितरण कंपनीला दिले होते . या पत्रात बोरी खुर्द हद्दीतील बहुसंख्य ठिकाणी वीजवाहक तारा खूप खाली लटकलेल्या आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करणे कठीण झाले आहे. तारामुळे कोणाच्याही जीवितास धोका होऊ शकतो आणि आणि बहुसंख्यठिकाणी उसाचे पिके जाळण्याचे प्रकार झाले आहेत , त्यामुळे आपण लवकरात लवकर लक्ष घालून सर्व तारा ताण आणि खांब दुरुस्त करून व्यवस्थित कराव्यात अशा आशयाची मागणी केली होती . मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पुढे आले आहे .