पोटच्या गोळ्याला बापाने वाऱ्यावर सोडले; पोलिसांनी आकाशपाताळ एक करून पुन्हा ''त्याला '' गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 06:07 PM2019-08-07T18:07:00+5:302019-08-07T18:18:54+5:30
आई वडिलांच्या घरगुती भांडणामध्ये अशाप्रकारे चिमुकल्याला वाऱ्यावर सोडल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली.
पुणे : रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु असताना चिमुकल्याचा रडण्याचा आवाज रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणाला ऐकू आला. आवाजाच्या दिशेने तो गेला असता मंदिराच्या पायरीवर त्याला अंदाजे दीड ते दोन वर्षांचा मुलगा दिसला. आई वडिलांच्या घरगुती भांडणामध्ये अशाप्रकारे चिमुकल्याला वाऱ्यावर सोडल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. ही हृदयद्रावक घटना कर्वेनगरमध्ये घडली आहे.
वारजे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित सुर्यवंशी (वय 24 .रा. थोरात कॉलनी, कर्वेनगर ) हा तरुण एका कामा निमित्ताने रात्री दोन वाजता कर्वेनगर मधील महालक्ष्मी मंदिरात जवळुन जात असताना एक दोन वर्षे मुलांचा रडण्याचा आवाज ऐकला आणि मंदिरांचा पायरीवर एक मुलगा (चंद्रशेखर साधुचरण पुष्टी वय 2 ,रा. साई ज्योत कॉलनी, रहाटणी ) मोठ्याने रडत प्रचंड थंडीने गारठलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत प्रणितला दिसला.
त्यावेळी प्रणित मुलाला घेऊन कर्वेनगरमधील चौकीत गेला आणि सर्व माहिती दिली. पोलिसांनी पुणे हद्दीत हरविल्याची माहिती घेण्यास सुरूवात केली असता कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर पिंपरी चिंचवड हद्दीत संपर्क साधला असता रहाटणीजवळ एक दोन वर्षे वयाचा मुलगा हरविल्याची तक्रार त्याच्या आईने दिल्याचे पोलिसांना कंट्रोल मार्फत समजण्यात आले. यावेळी वाकड पोलिस पण शोध घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बिटमार्शल अमोल पायगुडे, बाबासो नरळे, भास्कर खोत, भावेश सोडमिशे घटनास्थळी पोहचले आणि अनेक नागरिकांना उठवुन कोणाचा मुलगा झोपेत बाहेर गेला का ?याबाबत विचारणा केली. यावेळी स्थानिक नागरिक विभीषण मुंडे यांनी पोलिसांना मदत करत अनेक घरे पिंजुन काढली. पण मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
पोलिसांना पुणे हद्दीत हरविल्याची माहिती घेण्यास सुरूवात केली असता कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर पिपरी चिचंवड हद्दीत संपर्क साधला असता रहाटणी जवळ एक दोन वर्षे वयाचा मुलगा हरविल्याची तक्रार त्याचा आईने दिल्याचे पोलिसांना कंट्रोल मार्फत समजण्यात आले या वेळी वाकड पोलिस पण शोध घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यानंतर आधिक माहिती घेतली असता वारजे आणि वाकड पोलिसांनी घेतलेले फोटो बरोबर एकच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वारजे पोलिसांनी संबधित मुलाला वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी वाकड पोलिस चौकीत आईला पाहताच चंद्रशेखरने आईकडे जोरात धाव घेतली तेव्हा आईचा मायेचा बांध फुटला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले .
आई वडिलांच्या घरगुती भांडणाचा दोन वर्षे मुलाची इतकी फरपट कोणालाही पाहणार नाही. यावेळी कर्वेनगर मधील सामाजिक कार्यकर्ते बिभीषण मुंडे तसेच पोलिस नाईक अमोल पायगुडे, बाबासो नरळे, भास्कर खोत, भावेश सोडमिशे आणि मुलाला उघड्यावर न सोडता माणुसकी जपणारा प्रणित सुर्यवंशी यांचे विशेष आभार मानले गेले आहेत.