राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक - राधामोहन सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:55 AM2018-09-29T00:55:06+5:302018-09-29T00:55:45+5:30
जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी केले.
लोणी काळभोर - जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, एमआयटी, आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ व विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, यांच्यातर्फे विश्वराजबाग लोणी काळभोर येथे साकार होत असलेल्या
जगातील सर्वांत मोठ्या घुमटाकार वास्तूमध्ये तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृहात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण राधामोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी स्कूल आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांडे आदी उपस्थित होते.
राधामोहन सिंग म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची सुरुवात बिहारमधील चंपारण्य येथून केली होती.
सर्व जगाला अहिंसेचा संदेश येथूनच देण्यात आला. भविष्यात हा पुतळा सर्व जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देण्याचे काम करीत राहील. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाकार वास्तुचे लोकार्पण होणार आहे.