पैशाच्या हव्यासापोटी केला वडिलांचा खून

By admin | Published: September 24, 2015 02:56 AM2015-09-24T02:56:25+5:302015-09-24T02:56:25+5:30

पैशाच्या लालसेने एकुलत्या एका मुलाने झोपेत असलेल्या वडिलांचा मानेवर कोयत्याने सपासपा वार करून निर्घृण खून केला.

Father's blood has been sacrificed for money | पैशाच्या हव्यासापोटी केला वडिलांचा खून

पैशाच्या हव्यासापोटी केला वडिलांचा खून

Next

भोर : पैशाच्या लालसेने एकुलत्या एका मुलाने झोपेत असलेल्या वडिलांचा मानेवर कोयत्याने सपासपा वार करून निर्घृण खून केला. ही घटना आज पहाटे दीडच्या सुमारास वेळवंड (ता. भोर) गावातील गायमाळ वस्तीत घडली.
हरीभाऊ नाना पांगूळ (वय ६५) यांचा यात जागीच मृत्यू झाला. भोर पोलिसांनी आरोपी संतोष हरीभाऊ पांगूळ याला अटक केली असून, आज भोर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, भोरपासून ३० किलोमीटरवर भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या वेळवंड गावातील गायमाळ ही आठ ते दहा घरांची वाडी आहे. येथील हरीभाऊ नाना पांगूळ यांनी दीड वर्षापूर्वी आपली वडिलोपार्जित जमीन विकली होती. यातील एक लाख रुपये मुलगा संतोष हरीभाऊ पांगूळ याला त्यांनी दिले होते. मात्र, संतोष काहीच काम करीत नसल्याने हे पैसे संपल्याने वडिलांकडे त्याने पुन्हा पैशाचा तगादा लावला होता. वडील त्याला पैसे देत नव्हते. याचा राग धरून मंगळवारी रात्री घरात वडील झोपल्यावर सुमारे दीडच्या सुमारास संतोषने झोपेतच कोयत्याने वडिलांच्या मानेवर वार करून त्यांचा खून करून पळून गेला.
दरम्यान, पोलिसांना खबर मिळाल्यावर ते घटनास्थाळी गेले. मात्र, तेथे आरोपी न सापडल्याने त्याचा पाठलाग केला. भोर-पांगारी मार्गे भोरकडे येत असताना त्याला पहाटेच अटक केली. आज दुपारी भोर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मृत हरीभाऊ यांना संतोष हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याला मुलेही आहेत. मात्र, तो कोहीच कामधंदा करीत नसल्याने खर्चासाठी वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी करीत असे.पैसे मिळाले नाही, तर त्यांना मारहाण करीत असे. (वार्ताहर)

Web Title: Father's blood has been sacrificed for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.