मुलाला कमी गुण मिळाले म्हणून पित्याची आत्महत्या
By admin | Published: May 30, 2017 10:47 PM2017-05-30T22:47:55+5:302017-05-30T23:07:40+5:30
दहावीत ९१ टक्के गुण मिळविलेल्या मुलाने बारावीच्या परिक्षेत ७१ टक्के गुण मिळविले. नैराश्येपोटी चक्क पित्याने राहत्या घरी...
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 30 - दहावीत ९१ टक्के गुण मिळविलेल्या मुलाने बारावीच्या परिक्षेत ७१ टक्के गुण मिळविले. टक्केवारी घसरली, कमी गुण मिळवून त्याने अपेक्षाभंग केला. यामुळे आलेल्या नैराश्येपोटी चक्क पित्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी गाव येथे मंगळवारी घडली.
विश्वंभर माधवन पिल्ले (वय ४८ रा. सुखवानी कॉटेज, पिंपरीगाव) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वंभर यांचा मुलगा बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. बारावीचा निकाल जाहीर होणार म्हणून वडील आज सकाळपासूनच अस्वस्थ होते. त्यांच्यामुळे घरात तणावाचे वातावरण होते. दुपारच्या सुमारास मुलाचा बारावीचा निकाल समजला. मुलाला ७१ टक्के गुण मिळाले. एवढे गुण कमी कसे मिळाले, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही वेळाने त्यांनी घरातील बाथरुममध्ये जाऊन गळफास लावून घेतला, असे नातेवाईकांनी सांगितले आहे.
विश्वंभर यांचे भोसरीतील लांडेवाडी येथे नुटक इंजिनीयरींग नावाचे वर्कशॉप आहे. मुलाने बारावीमध्ये चांगले गुण मिळवावेत, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र मुलाला गुण कमी मिळाले. अपेक्षाभंग झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत चौकशी केली. दरम्यान, आत्महत्येमागे हेच कारण आहे की, अन्य कोणते कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.