इंग्रजीमध्ये पोषण आहाराची माहिती इंग्रजीमध्ये भरण्याचा अंगणवाडी सेविकांना फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:27+5:302021-06-17T04:08:27+5:30

कोरोनाच्या गंभीर परिस्थिती अंगणवाडी सेविका गावतील घरोघरी जाऊन सर्वेक्षण व माहिती संकलनाचे काम करत आहेत. या अंगणवाडी सेविकांपैकी अनेक ...

Fatwa for Anganwadi workers to fill in nutrition information in English | इंग्रजीमध्ये पोषण आहाराची माहिती इंग्रजीमध्ये भरण्याचा अंगणवाडी सेविकांना फतवा

इंग्रजीमध्ये पोषण आहाराची माहिती इंग्रजीमध्ये भरण्याचा अंगणवाडी सेविकांना फतवा

Next

कोरोनाच्या गंभीर परिस्थिती अंगणवाडी सेविका गावतील घरोघरी जाऊन सर्वेक्षण व माहिती संकलनाचे काम करत आहेत. या अंगणवाडी सेविकांपैकी अनेक सेविका या काही वर्षांत सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांचे त्यावेळचे शिक्षणदेखील कमी आहे. बऱ्याच सेविकांना इंग्रजी पुरेसे ज्ञान नाही. परंतु जिल्हा परिषदेने वरील सर्व माहिती इंग्रजीत भरणे सक्तीचे केले आहे. ही माहिती भरताना अंगणवाडी सेविकांना जिकिरीचे होत आहे.

अंगणवाडीमधील सेविकांना मूळ उद्दिष्टांची कामे सोडून किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वर्षी वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण, मुलांना पोषण आहार, आरोग्याची काळजी, त्यांचे शिक्षण त्यांना देण्यात देत असलेल्या लसीकरण, त्याचबरोबर अंगणवाड्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांची माहिती त्या परिसरातील जन्मदर, मृत्यूदर ही सर्व माहिती या अंगणवाडी सेविकांकडे सोपवलेली आहे.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पात प्रकल्प अधिकारी, लिपिक, प्रशिक्षित संगणकीय असणारे अधिकारी असताना देखील कमी शिक्षित असलेल्या अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्यासाठी सक्ती का केली जाते ?

इंग्रजीमध्येच माहिती भरण्याची सक्ती रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रचलित असलेल्या मराठीमध्ये माहिती भरण्याची पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

आयुक्तांना यासंदर्भात पत्र देण्यात आले असून इंग्रजीमधील माहिती मराठीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अंगणवाडी सेविकांनी व्हॉइस की-बोर्डचा वापर केल्यास सर्व अंगणवाडी सेविकांना यासंदर्भात राज्यभर ट्रेनिंग देण्यात येत आहे. यासाठी सुपरवायझर ब्लॉक ऑडिटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाने दिलेला मोबाईल जर बंद पडला तर खासगी मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून माहिती भरण्यात येते जेणेकरून सेविकांचे मानधन थांबू नये.

सूरज मुटके (जिल्हा समन्वयक पोषण अभियान)

Web Title: Fatwa for Anganwadi workers to fill in nutrition information in English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.